Home जालना अंमलीपदार्थ गांजा विक्री साठी बाळगणाऱ्या आरोपीवर गोंदी पोलिसांची कारवाई

अंमलीपदार्थ गांजा विक्री साठी बाळगणाऱ्या आरोपीवर गोंदी पोलिसांची कारवाई

145

आशाताई बच्छाव

1001229097.jpg

अंमलीपदार्थ गांजा विक्री साठी बाळगणाऱ्या आरोपीवर गोंदी पोलिसांची कारवाई
जाफराबाद तालुका प्रतिनिधी- मुरलीधर डहाके
दिनांक 12/02/2025
सविस्तर वृत्त असे की दिनांक 10/02/2025 रोजी सहायक पोलिस निरीक्षक आशिष खांडेकर यांना माहिती मिळाली की, महाकाळा येथील जिलानी यांच्या वाड्यात अवैध विक्री करीता गांजा बाळगल्याची माहिती मिळाली. त्यावरून सहायक पोलिस निरीक्षक आशिष खांडेकर यांनी सदर बाब वरिष्ठांना कळविली. त्यावरून उपविभागीय अधिकारी साहेब अंबड विशाल खांबे यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांचा स्टॉप व पोलीस स्टेशन स्टॉपसह नमूद ठिकाणी छापा मारला. तेथे अंमली पदार्थ गांजा एकूण 29.650 कीलो 8,91,850 मिळून आला. त्यात सदर गुन्ह्याच्या अनुषंगाने अधीक तपास करता इसम नामे 1) जीलानी शेख 2) मुजम्मिल शेख 3) मुस्तकीम शेख 4) नुसरतजहा अफसर शेख असे एकमेकांच्या मदतीने महाकाळ येथे गांजा विक्रीचा व्यवसाय करीत असल्याची माहिती मिळाली त्यावरून सदरचा गांजा जप्त करण्यात आला असून अरोपिता विरुद्ध पोलीस ठाणे गोंदी येथे NDPS कायदा 1985 चे कलम 8(क), 20(ब), 11(क)सह 3(5) भारतीय न्याय संहिता प्रमाणे पोलीस नाईक बाबासाहेब डमाळे यांच्या तक्रारी वरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदरची कामगीरी ही मा. पोलीस अधीक्षक श्री अजयकुमार बंसल साहेब, मा. अप्पर पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी साहेब, मा. उपविभागीय पोलिस अधिकारी अंबड, श्री विशाल खांबे साहेब, यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक आशिष खांडेकर , पोलीस उमहानिरीक्षक बलभीम राऊत, पोलीस उपनिरीक्षक इब्राहिम शेख, पोलीस उमहानिरीक्षक किरण हावले, पोलीस उपनिरीक्षक प्रतिभा पठाडे, पोलीस हेड कॉन्स्टेबल गणेश मुंढे, पोलीस कॉन्स्टेबल दीपक भोजने, सिद्दीकी, सुरेश राठोड, अंकुश पठाडे, अंकुश पोटे, नवनाथ राऊत, शहादेव कणसे महिला कॉन्स्टेबल राठोड, मीरा मुसळे यांनी कारवाई केली असून सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलिस निरीक्षक आशिष खांडेकर हे करीत आहेत.