Home भंडारा खरंच “दारू” ही माणसाला अखेर काय करवून सोडते – अनामिक बांधव

खरंच “दारू” ही माणसाला अखेर काय करवून सोडते – अनामिक बांधव

276

आशाताई बच्छाव

1001150480.jpg

खरंच “दारू” ही माणसाला अखेर काय करवून सोडते – अनामिक बांधव

बाम्हणी शाळेत “अल्कोहोलीक्स ॲनॉनिमस” समुहाचा द्वितीय वर्धापन दिन संपन्न

गोंदिया (संजीव भांबोरे) “खरंच “दारू” ही माणसाला या जीवनात काय काय करायला लावते, की ज्याने माझा ट्रेनमध्ये माझ्या ३ वर्षाच्या चिमुकल्या मुलासमोरच भांडणात माझा जीव जाता जाता वाचला” असे आत्मनुभव कथन “अल्कोहोलीक्स ॲनॉनिमस” मध्ये येऊन मद्यमुक्त झालेल्या अनामिक बांधवाने आपल्या सत्य प्रसंगातून अनुभव कथनात सांगितला. जिल्हा परिषद वरिष्ठ शाळा बाम्हणी, ता. सडक अर्जूनी प्रांगणात ( रवि. १२ जाने.) ला निर्माण समुहाच्या द्वितीय वर्धापन दिन सोहळा साजरा करण्यात आला.
अल्कोहोलीक्स ॲनॉनिमस निर्माण समुह बाम्हणी/खडकी या समुहाचा द्वितीय वर्धापन दिन सोहळ्याला मंचावर बाम्हणी उपसरपंच लेखलाल टेकाम , पोलीस पाटील देवानंद गेडाम, चंद्रकुमार सोनुने हे उपस्थित होते. “मद्यपाश” नावाचा एक जिवघेणा आजार आहे. पण तो व्यसनात तल्लीन झालेल्या माणसाला लक्षात येत नाही. शेवटी त्याचा अंत म्हणजे अकाली मृत्यूच आहे. अल्कोहोलीक्स ॲनॉनिमस या जागतिक स्तरावरील संघटनेत अश्या मद्यसक्त जीवनातील कटू अनुभव कथन करीत निःशुल्क सभा आयोजित करून आज परीसरातील शेकडोंच्या वर मद्यपी येथे येत मद्यमुक्त झाले आहेत. या वर्धापन दिन प्रसंगी सामा. कार्यकर्ता सोनुले यांनी सांगितले की, दारू पिणा-या व्यक्तीस केवळ दारू आणि दारूच हेच जीवनात उद्देश असतो. शेवटी त्याचा अकाली मृत्यू होतो. पण या अल्कोहोलीक्स ॲनॉनिमस मध्ये मी आज स्वतः बघतो आहे की जे या बाम्हणीत कट्टर मद्यपी आणि दारूसाठी वाट्टेल ते करणारे बांधव आज येथे मद्यमुक्त निःशुल्क सभा घेतात. हेच परीवर्तन ही संघटना करीत आहे. पोलीस पाटील गेडाम म्हणाले की, ज्यांना मद्यपाश नावाचा एक आजार झाला आहे हे समजले तर तो व्यक्ती येथे येऊन हमखास आपले जीवन मृत्यू पासून वाचवू शकतो. मंच अध्यक्षीय उपसरपंच लेखलाल टेकाम यांनी सांगितले की, एक अट्टल दारूडा व्यक्ती या अल्कोहोलीक्स ॲनॉनिमस या निःशुल्क सभेत १ तास बसून कसा मद्यमुक्त होतो हीच या संघटनेत कृतीमय जादू होते. कारण तो अन्य सदस्यांच्या दारूड्या जीवनातील कटू अनुभव, खून प्रकरण, भांडणात तुरूंग व कोर्टात प्रकरणे, कौटुंबिक कलह आणि शिक्षा भोगणे याने त्याच्या पत्नी मुलांवर शोकमय प्रसंग कसे आले होते, हेच तो अचानक मनावर घेऊन कायमची दारू सोडतो असे प्रतिपादन केले.
या “मद्यपाश एक जीवघेणा आजार” विषयावर आयोजित द्वितीय वर्धापन दिनानिमित्त निर्णय समुह सौंदड/रेल्वे, युनिटी समुह साकोली, निर्माण समुह बाम्हणी, सुंदरी/चारगांव समुह, मानवता समुह लाखांदूर, आंतरसमुह ब्रम्हपुरी येथील एए बांधव आणि ॲल अनॉन भगिनी उपस्थित होते. सोहळ्याला संचालन युनिटी समुहाचे प्रमोद एम यांनी तर आभार देवराम यांनी केले.

Previous articleमुख्यमंत्री फडणवीस यांची प्रदेशाध्यक्ष आमदार नाना पटोले यांच्या घरी सांत्वन भेट
Next articleमहत्वाची बातमी…. सावधान !
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.