Home जालना जालना शहरातील कन्हया नगर ते नावाचं चौफुली दरम्यान मोटर सायकलस्वारनां लुटणारे तीन...

जालना शहरातील कन्हया नगर ते नावाचं चौफुली दरम्यान मोटर सायकलस्वारनां लुटणारे तीन आरोपी मुद्देमालासह जेरबंद.

128

आशाताई बच्छाव

1001121450.jpg

जालना शहरातील कन्हया नगर ते नावाचं चौफुली दरम्यान मोटर सायकलस्वारनां लुटणारे तीन आरोपी मुद्देमालासह जेरबंद.
प्रतिनिधी जालना -वसंतराव देशमुख
दिनांक 05/01/2025
जालना शहरात दिनांक 08/07/2024 रोजी फिर्यादी ज्ञानेश्वर भास्करराव घुमरे वय 39 वर्ष रा. लक्ष्मी नगर मंठा चौफुली जालना यांनी पोलीस ठाणे तालुका जालना येथे फिर्याद दिली होती की, ते त्यांच्या होंडा कंपनीच्या शाईन मोटरसायकल वरून रात्री 21: 30 वाजेच्या सुमारास कन्हैया नगर ते नाव्हा चौफुली बायपासने घराकडे जात असतानां वनविभाग कार्यालयाच्या जवळ पाठीमागून एक मोटरसायकल वरून दोन अनोळखी इस्मानी त्यांना ओव्हरटेक करून त्यांना थांबून व मोटरसायकल वरून खाली पाडून त्यांच्या खिशातील 10,000 रुपये किंमतीचा वन प्लस कंपनीचा नोर्ड 2 मोबाईल व 30,000 रुपये किंमतीची होंडा कंपनीची शाईन मोटरसायकल ही बळजबरीने हिसकावून नेली म्हणून अज्ञात आरोपीविरुद्ध पोलीस ठाणे तालुका जालना येथे गु.र.न. 442/2024 कलम 309-(4 )भा.न्या.स. गुन्हा दाखल झाला होता.
त्यानुषंगाने दिनांक 04/01 2025 रोजी स्थानिक गुन्हे शाखेतील पोलीस अधिकारी व अंमलदार हे नमूद गुन्ह्यातील अज्ञात गुन्हेगारांचा शोध घेत असताना गुप्त बातमीदारा मार्फत व तांत्रिक माहितीच्या आधारे सदरचा गुन्हा हा आरोपी 1)रामेश्वर दिलीप कांबळे रा. मोगलाई चौक जालना याने त्याचे साथीदार,2) संदीप निलेश लिदोरे रा. वल्ली मामू दर्गा जालना, 3)रोहित ज्ञानेश्वर ननवरे रा. श्रुती कॉलनी महिंद्रा शोरूमच्या मागे जालना यांचे सह गुन्हा केल्याची कबुली दिल्याने तिन्ही आरोपींना विचारपूस केली असता त्याने गुन्हा केल्याची कबुली देऊन त्यांच्याकडून गुन्ह्यातील फिर्यादीचा 10,000 किंमतीचा वन प्लस कंपनीचा नोर्ड 2 मोबाईल व फिर्यादीची तीस हजार रुपये किमतीची होंडा कंपनीची शाईन मोटरसायकल व गुन्हा करतांना वापरलेली 10,000 रु. किमतीची हिरो कंपनीची पॅशन प्लस मोटरसायकल असे एकूण 50 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
सदर प्रकरणात पोलीस ठाणे तालुका जालना येथे गुरनं. 442 /2024 कलम 309 (4)) भा.न्या.सं.प्रमाणे गुन्हा दाखल असून सदर गुन्हा उघडकीस आणला आहे. तरी नमूद आरोपीस पुढील तपास कामी तालुका जालना यांच्या ताब्यात दिली आहे.
सदरची कारवाई मा. पोलीस अधीक्षक श्री अजय कुमार बंसल व मा. अप्पर पोलीस अधीक्षक श्री आयुष नोपानी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री पंकज जाधव, सपोनी योगेश उबाळे, पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र वाघ, व सोबत स्थागुशा चे सॅम्युएल कांबळे, लक्ष्मीकांत आडेप ,सुधीर वाघमारे, भाऊराव गायके, सागर बाविस्कर, सतीश श्रीवास, अक्रूर धांडगे योगेश सहाने, धीरज भोसले, कैलास चेके, यांनी केली आहे.

Previous articleमोरया डेंटल क्लिलिनिकचे धुळे प्रांताधिकारी श्री रोहन रघुनाथ कुवर यांच्या हस्ते शुभारंभ
Next articleशनिशिंगणापूर विकासाला चालना देणार
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.