Home उतर महाराष्ट्र शनिशिंगणापूर विकासाला चालना देणार

शनिशिंगणापूर विकासाला चालना देणार

93

आशाताई बच्छाव

1001124133.jpg

शनिशिंगणापूर विकासाला चालना देणार.                 अहिल्यानगर कारभारी गव्हाणे प्रतिनिधी 

राधाकृष्ण विखे : देवस्थानला विकासात्मक सूचना
शनिशिंगणापूरला वाढत असलेला महिमा व येथे होत असलेली देशभरातील भक्तांची गर्दी लक्षात घेऊन येथे भाविकांच्या हितार्थ शासनाच्या माध्यमातून विकासात्मक कार्य करताना जवळच असलेल्या सोनई गाव व परिसरात काही सुविधा निर्माण केल्या जातील, असे प्रतिपादन जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी व्यक्त केले.
विखे-पाटील यांनी आज नेवासे येथे आयोजित सत्कार समारंभ कार्यक्रमास जाण्याच्या अगोदर शनिशिंगणापूरला भेट देऊन शनिमूर्तीला तेल अभिषेक
केला. देवस्थानच्या जनसंपर्क कार्यालयात विश्वस्त समितीचे अध्यक्ष भागवत बानकर यांनी विखे पाटील यांचा शाल, श्रीफळ व प्रसाद देऊन सत्कार
केला. यावेळी आमदार विठ्ठलराव लंबे, भाजपचे अहिल्यानगर उत्तर जिल्हाध्यक्ष नितीन दिनकर, माजी विश्वस्त सयाराम बानकर, मराठा महासंघाचे संभाजी दहातोंडे, किसनराव गडाख, डॉ. बाळासाहेब कोलते, डॉ. संतोष लांडे, ऋषिकेश शेटे, शकील बागवान उपस्थित होते.
दर्शनासाठी मंदिर परिसरात गर्दी असताना विखे-पाटील यांच्या वाहनांचा ताफा जनसंपर्क कार्यालयासमोर आल्यानंतर भक्तांना अडचण आल्याची
बाब विखे-पाटील यांनी देवस्थान ट्रस्टला सांगून दर्शन रोग व्यवस्था तसेच जनसंपर्क कार्यालयात काही बदल सुचविले. अध्यक्ष बानकर यांनी आवश्यक बदल तातडीने केल्या जातील असे सांगितले, राज्य सरकारच्या माध्यमातून नेवासे येथील संत ज्ञानेश्वर महाराज पैसखांब मंदिराचा चेहरामोहरा बदलून जाईल असा विश्वास व्यक्त करताना शनिशिंगणापूर येथेही विकासाचा धागा विणला जाईल, असेही सांगितले.

Previous articleजालना शहरातील कन्हया नगर ते नावाचं चौफुली दरम्यान मोटर सायकलस्वारनां लुटणारे तीन आरोपी मुद्देमालासह जेरबंद.
Next articleशिवजन्मोत्सव सोहळा समिती नाशिक रोड २०२५ यांची कार्यकारणी जाहीर झालेली
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.