Home भंडारा सर्व महिलांनी सतर्क राहावे – सरपंच नंदू समरीत पिंडकेपार येथे “पे टू...

सर्व महिलांनी सतर्क राहावे – सरपंच नंदू समरीत पिंडकेपार येथे “पे टू पे दान” साठी ५५० रू. ची पावती फाडा प्रकरण

128

आशाताई बच्छाव

1001104597.jpg

सर्व महिलांनी सतर्क राहावे – सरपंच नंदू समरीत

पिंडकेपार येथे “पे टू पे दान” साठी ५५० रू. ची पावती फाडा प्रकरण

संजीव भांबोरे
भंडारा ( जिल्हा प्रतिनिधी)
कोणत्याही शासकीय “बेटी बचाओं, बेटी पढाओं” या योजनेला शासनातर्फे कोणतेही शुल्क अथवा पैसे आकारले जात नाही. पण नुकतेच साकोली जवळील पिंडकेपार येथे महिलांतर्फे एका राजस्थान येथील एन जी ओ संस्थेच्या पावतीवर ग्रामीण महिलांकडून “पे टू पे दान घ्या, दान द्या” ५५० रूपये घेऊन ती पावती महिलांना देण्यात येत आहे. या प्रकरणी गोरगरीब महिलांनी याची संपूर्ण शहानिशा करूनच आर्थिक व्यवहार करावा, असे पैशे मागण्याची शासनाची कोणतीही योजना नाही, असा सल्ला व आवाहन गावचे उच्चशिक्षित सरपंच नंदू ब्रिजलाल समरीत यांनी “युवाराष्ट्र दर्शन” शी बोलतांना केले आहे.
तीन दिवसांपूर्वी काही महिलांच्या माध्यमातून “बेटी बचाओं बेटी पढाओं” नावावर एक “कार्यकर्ता बनने के फायदे” अशी पाच पानांची फाईल देऊन “पे टू पे सोशियल फाऊंडेशन – ३६, किरण पथ मानसरोवर जयपूर ( राज.) ची दान राशि रसीद देऊन प्रती ५५०/- रू पावती फाडीत आहेत. त्यात एका जागृत जनतेने ती पावती साकोली मिडीया प्रसारमाध्यमावर टाकली. याबबद मिडीयाने पिंडकेपार सरपंच नंदू ब्रिजलाल समरीत यांना माहिती विचारली. तर यांनी ग्रामपंचायत कडून गावात ह्या पावत्या फाडण्यासाठी कोणतीही परवानगी वा ना हरकत घेतली नाही. तर अश्या शासकीय योजनेत शासन कोणतेही शुल्क अथवा पैसे आकारले जात नाही असे कळले. सदर फाईल मध्ये “लेव्हल, इन्कम रिवार्ड” मधून स्कुटी, अल्टो कार, ब्रिझा कार व जीप हे रॉयल्टी इन्कमवर दर्शविले असून विविध आरोग्य, आर्थिक मदतीचे नमूद केले आहे. आता यात शासन असे कोणतेही स्कीम देत नसून शासनाच्या नावाने एकप्रकारे पैसे उकळण्याचा हा नेमका प्रकार तर नाही अशी शंका येथील शिक्षित जनतेने व्यक्त केली असून साकोली शहरापर्यंतही लाखांदूर रोडवर योजना अशिक्षित महिलांकडे आलेली असल्याची माहिती पुढे आली आहे.

यावर काय म्हणाले सरपंच –
“अश्या प्रकारची बेटी बचाओं बेटी पढाओं वर ५५० रू ची पावती फाडा बाबद कोणतीही परवानगी ग्रामपंचायत पिंडकेपार कडून घेण्यात आली नाही. गोरगरीब महिलांचे आपले कष्टाचे पैसे वाया जाऊ नये म्हणून या प्रकरणाची संपूर्ण, सखोल, शासकीय कागदोपत्री शहानिशा करूनच त्यांचेशी आर्थिक व्यवहार करावा, याबाबद साकोली पोलीसांना ही माहिती देण्यात येईल”
— नंदू ब्रिजलाल समरीत
“सरपंच” आदर्श गाव पिंडकेपार ता. साकोली

Previous articleबहुजन विद्युत अभियंता,अधिकारी व कर्मचारी फोरम चा वीज कर्मचारी जागृती मेळावा संपन्न.
Next articleवय वृद्ध कलावंतांची ऑफलाईन अर्ज तपासून निवड करा
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.