आशाताई बच्छाव
बहुजन विद्युत अभियंता,अधिकारी व कर्मचारी फोरम चा वीज कर्मचारी जागृती मेळावा संपन्न.
चाळीसगाव प्रतिनिधी विजय पाटील- बहुजन विद्युत अभियंता, अधिकारी व कर्मचारी फोरम जळगांव परिमंडळस्तरीय वीज कर्मचारी जागृती मेळावा दिनांक 29/12/2024 रोजी बालाजी लॉन्स, धुळे येथे संपन्न झाला.
मेळाव्याचे उद्घाटन संघटनेचे सल्लागार डी. के. दाभाडे यांनी केले. मेळाव्याचे अध्यक्षस्थानी केंद्रीय अध्यक्ष धर्मभुषण बागुल तर मुख्य अतिथी म्हणून मुख्य अभियंता इब्राहिम मुलानी व कार्याध्यक्ष विजय सोनवणे हे स्वागताध्यक्ष म्हणून उपस्थित होते.
यावेळी झोन मधील जळगाव , धुळे व नंदुरबार सर्कल मधील 700 पेक्षा जास्त वीज कर्मचारी उपस्थित होते. मुख्य अतिथी मा.श्री. इब्राहिम मुलानी मुख्य अभियंता जळगाव परिमंडळ यांनी कर्मचाऱ्यांना सुरक्षा साधनांचा वापर करून सुरक्षित कामे करण्याचे आवाहन केले तसेच सोलर पंप कनेक्शन माहिती देवून महावितरणची सध्याची परिस्थितीत नियमित कामे करून ग्राहकास चांगली सेवा देण्याचे आवाहन केले. अधीक्षक अभियंता धुळे मंडळ निरज वैरागडे यांनी त्यांच्या मनोगतात मेळाव्यास शुभेच्छा दिल्यात.
संघटनेचे अध्यक्ष धर्मभूषण बागुल यांनी अध्यक्षीय भाषणात मुख्यालय स्थरावरील कामगारांच्या प्रश्नाची माहिती दिली व सभासदांना संघटन वाढविण्याचे आवाहन केले.
आरक्षणाच्या रिक्त जागा भरणे , कंत्राटी पद्धतीवर बंद करावी.खाजगी एजन्सी कडून नोकर भरती करणे बंद करावे.
वर्ग 1 ते 4 ची 32 हजार रिक्त पदे अनुशेषासह भरणे, महावितरणची 329 उपकेंद्र खाजगी कंत्राटदाराला देण्यात येणारा निर्णय मागे घेणे, वीज कर्मचाऱ्यांवर वीज ग्राहकांकडून होणाऱ्या जीवघेण्या हल्यावर स्वरक्षण मिळणे, मयत कर्मचाऱ्यांच्या वारसांना अनुकंपा तत्त्वावर त्वरित नोकरी मिळणे,
बदली धोरण, पदोन्नती, निवृत्ती धारकांचे प्रश्न व कामगारांच्या प्रश्नांवर अध्यक्षांनी संघटनेची भूमिका मांडली. लाईन स्टाफ व कार्यालयीन कर्मचाऱ्यांना सन्मानाने वागवावे.अशी ठाम भूमिका मांडून जळगाव झोन मध्ये सलोख्याचे आणि जिव्हाळ्याचे नाते तयार करावे.असे आवाहन धर्मभुषण बागुल यांनी केले.
स्वागताध्यक्ष विजय सोनवणे यांनी सर्वांचे स्वागत केले.
या प्रसंगी २० नवीन सभासदांनी बहुजन फोरम मध्ये प्रवेश घेतला त्यांचे स्वागत करण्यात आले.
मेळाव्यास उपाध्यक्ष डी.डी.भामरे, सल्लागार श्रीपत निकम, प्रसिद्धी प्रमुख किरण दोंदे सह मोठ्या संख्येने सभासद, पदाधिकारी उपस्थित होते.
मेळावा यशस्वी करणेकामी झोन अध्यक्ष कारभारी केदार, कार्याध्यक्ष स्वप्नील सूर्यवंशी, उपाध्यक्ष मनोज पवार,सचिव चरण पांढरे, धुळे सर्कल अध्यक्ष दिनेश ठाकूर, विजय चव्हाण, धुळे विभाग अध्यक्ष नितीन शिंदे, भारत मराठे यांनी नियोजन केले






