आशाताई बच्छाव
देवळा तालुका प्रतिनिधी भिला आहेर :- देवळा तालुक्यातील नामांकित कसमादे करियर व स्पोर्ट अकॅडमी देवळा येथे कसमादे परिसरातील तरुणांना व तरुणींना भारतीय सुरक्षा दलामध्ये व पोलीस दलामध्ये भरती होण्यासाठी विशेष मार्गदर्शन चे आयोजन केले होते या आयोजनामध्ये सह्याद्री करियर अकॅडमी बारामती चे चेअरमन माननीय श्री उमेश रूपनवर सर व सौ रुपनवर उपस्थित होते.
विशेष करियर मार्गदर्शनासाठी सुमन कन्स्ट्रक्शन लिमिटेड नाशिक चे चेअरमन व आमचे सहकारी मित्र माजी सैनिक जयेश पाटील यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
श्रीयुत उमेश रुपनवर सरांच्या या मार्गदर्शना मध्ये त्यांनी नव तरुणांसाठी व तरुणींसाठी सैन्य दलामध्ये परीक्षेची तयारी व फिजिकल पात्रतेची तयारी कशी करावी याबद्दल विशेष मार्गदर्शन केले.
विद्यार्थ्यांनी भरती प्रक्रियेच्या परीक्षेसाठी अभ्यास कसा करावा अभ्यास करण्याची प्रणाली व फिजिकल पात्रतेची प्रणाली याबद्दल विशेष मार्गदर्शन केले.
भारतीय सुरक्षा दलामध्ये किंवा महाराष्ट्र पोलीस दलामध्ये भरती होण्यासाठी विद्यार्थ्यांमध्ये मेहनत करण्याची जिद्द नेहमी बाळगून ठेवावी. एक वेळा किंवा दोन वेळा अपयश आल्यानंतरही त्याच परीक्षेची परिश्रम करून अभ्यास करून परत यशस्वी होण्यासाठी जिद्द सोडू नये व आपले करिअर यशस्वी घडवून आणावे व आपल्या परिवाराशी गावाचे मार्गदर्शकाचे व जिल्ह्याचे नाव उंच शिखरावर पोहोचवावे असे मोलाचे मार्गदर्शन केले.
यावेळी उमेश सरांनी कसमादे करिअर व स्पोर्ट्स अकॅडमी देवळा यांना महाराष्ट्र पोलीस भरतीपूर्व तयारीचे त्यांनी स्वतः लिहिलेले पुस्तक भेट दिले.
याप्रसंगी कार्यक्रमासाठी
देवळा तालुका माजी उपनगराध्यक्ष माननीय अशोक आहेर, कर्मवीर रामरावजी आहेर कॉलेजचे उपप्राचार्य सर, डॉक्टर अनिल चव्हाण, कर्मवीर रामराव आहेर पतसंस्थेचे माजी चेअरमन श्री युवराज (अण्णा) आहेर, नगरसेवक संतोष शिंदे, इंदिरा गांधी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय खर्डे चे मुख्याध्यापक श्री संजय आहेर सर , डॉ. वसंतराव आहेर, औद्योगिक प्रशिक्षण केंद्र देवळा चे मुख्याध्यापक सर, देवळा तालुका परिसरातील शेकडो विद्यार्थी या कार्यक्रमासाठी उपस्थित होते.
छत्रपती संस्थांनचे संस्थापक अध्यक्ष संदीप भाऊ पवार यांनी सूत्रसंचालन केले.
कसमादे करिअर व स्पोर्ट्स अकॅडमी चे सर्व पदाधिकारी विद्यार्थी व विद्यार्थिनी यांनी या आयोजनासाठी विशेष परिश्रम घेतले.
माजी सैनिक प्रविण बोरसे यांनी मान्यवरांचे आभार मानत कार्यक्रम संपन्न झाल्याचे जाहीर केले.