आशाताई बच्छाव
मालेगावी आज विद्यार्थी गुणगौरव सोहळा व पुरस्कार वितरण समारंभ! “युवा मराठा” चे राजेंद्र पाटील राऊत यांना शिवहिंद समाजरत्न पुरस्कार जाहीर…
(प्रविण क्षीरसागर प्रतिनिधी)
मालेगाव:- येथील सामाजिक कार्यासाठी अग्रेसर असलेल्या जय शिवराय ग्रुपच्या वतीने आज शिवराज्याभिषेक दिनाचे औचित्य साधून विद्यार्थी गुणगौरव सोहळा व विविध क्षेत्रातील मान्यवरांना “शिवहिंद समाजरत्न पुरस्कार”वितरण समारंभाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती या ग्रुपच्या पदाधिकाऱ्यांनी दिली.
याबाबत प्राप्त माहितीनुसार जय शिवराय ग्रुपच्या वतीने या पुरस्कार वितरण समारंभाचे आयोजन हे १९ फेब्रुवारी रोजी करण्यात आले होते, मात्र काही अपरिहार्य कारणास्तव हा कार्यक्रम स्थगित करण्यात आला होता.त्या कार्यक्रमाचे आयोजन आज सायंकाळी सात वाजता मालेगाव शहरातील कँम्प भागात करण्यात आले आहे.या कार्यक्रमातून सुरज गुंजाळ उपविभागीय पोलिस अधिकारी, उमेश बोरसे सहायक पोलिस निरीक्षक कँम्प पोलिस स्टेशन, प्रविण पवार क्राईम डायरी संपादक,विजया माळी सामाजिक कार्यकर्त्या, राजेंद्र पाटील राऊत संस्थापक अध्यक्ष आश्रयआशा फाऊंडेशन, सिध्दार्थ पानपाटील अध्यक्ष छत्रपती राजर्षी शाहू महाराज सेवाभावी संस्था,राजूबाबा पाटील प्रदेशाध्यक्ष मानवाधिकार सुरक्षा परिषद, डॉ.संजय पवार अग्निशमन अधिकारी आदींना “शिवहिंद समाजरत्न पुरस्कार २०२५” देऊन सन्मानित केले जाणार आहे.या कार्यक्रमाच्या व्यशस्वीतेसाठी जय शिवराय ग्रुपचे पदाधिकारी विशेष परिश्रम घेत आहेत.






