Home भंडारा महिलांना आता मिळणार दरमहा ७०००/- रुपये महिना! काय आहे सखी योजना वाचा...

महिलांना आता मिळणार दरमहा ७०००/- रुपये महिना! काय आहे सखी योजना वाचा सविस्तर

458

आशाताई बच्छाव

1000990724.jpg

प्रधानमंत्री बिमा सखी योजनेचा महिलांनी लाभ घ्या – पुजा कुरंजेकर

केंद्र शासन अंतर्गत भारतीय आयुर्विमा महामंडळातर्फे महिलांसाठी ७ हजार मासिक वेतन योजना

संजीव भांबोरे
भंडारा( जिल्हा प्रतिनिधी) –भारत सरकारने देशातील सर्व महिलांसाठी रोजगाराच्या नवीन संधी निर्माण करण्याकरिता भारतीय आयुर्विमा महामंडळाच्या अंतर्गत “मोदी सरकार” योजनेचा एक भाग म्हणून प्रधानमंत्री बिमा योजना सुरू करून पात्र महिलांना प्रतीमाह ७ हजार रुपये मासिक वेतन देण्याची घोषणा केली आहे. त्या अनुषंगाने प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हे ०९ डिसेंबर २०२४ ला पानिपत येथून प्रधानमंत्री बिमा सखी योजनेचा शुभारंभ करीत आहे. या अभिनव योजनेचा लाभ जास्तीत जास्त महिला जनतेने घ्यावा असे आवाहन साकोली शाखेतील मुख्य विमा सल्लागार पुजा कुरंजेकर यांनी केले आहे.
प्रधानमंत्री बिमा सखी योजनेकरिता खासकरून देशातील महिलांमध्ये उत्साह वातावरण निर्माण झालेला आहे. ही योजना महिलांच्या आर्थिक फायद्याची असल्यामुळे या योजनेला सफल करण्यासाठी केंद्र सरकार प्रयत्नशील आहे. या योजनेअंतर्गत महिला “बिमा सखी” नियुक्त करून भारतीय आयुर्विमा महामंडळाच्या अंतर्गत महिला विमा अभिकर्त्यांचे कार्य करणार आहेत. पानिपत मध्ये या कार्यक्रमाची जोरदार तयारी सुरू आहे. मुख्य सचिव विवेक जोशी यांनी जिल्हा प्रशासन सोबत व्हिडिओ कॉन्फन्सद्वारे मीटिंग घेतली आहे. या मीटिंग मध्ये कार्यक्रमाची रूपरेषा ठरविण्यात आली. शासनाद्वारे या योजनेत ३५००० पेक्षा जास्त महिला सहभागी होऊ शकतात. ०९ डिसेंबर २०२४ ला प्रधानमंत्री मोदी यांच्या हस्ते योजनेचा शुभारंभ होणार आहे आणि महीला अभिकर्त्यांना प्रधानमंत्री यांच्या हस्ते प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. ही योजना महीलांकरिता अतिशय फायदेशीर ठरणार आहे असे मत यावेळी पुजा कुरंजेकर यांनी व्यक्त केले. याअंतर्गत महिलांना आर्थिक व सामाजिक बाबतीत शक्तिशाली बनविणार आहे.
या योजनेच्या अंतर्गत महिलांना आपल्या परिवारातील व्यक्तींच्या पालनपोषणासाठी आर्थिक मदत होणार आहे. यासाठी फक्त १० पास महिलाच या योजनेसाठी आवेदन फॉर्म भरू शकतात.
महिलांना या योजनेंतर्गत जितक्या जास्त बिमा करणार तितका जास्त कमीशन त्यांना मिळणार असून सोबतच मासिक वेतनही देण्यात येणार आहे. महिलांना या अंतर्गत तीन वर्ष मासिक वेतन मिळणार आहे. यामध्ये पहिल्या वर्षी ७०००/- रुपये, दुसऱ्या वर्षी ६०००/- रुपये, तिसऱ्या वर्षी ५०००/- रुपये मासिक वेतन मिळणार. या योजनेत साधारणतः १८ वर्ष ते ५० वर्ष वयोगटातील महिला आवेदन करू शकतात. योजनेत सहभागी होण्यासाठी खासकरून इच्छुक महिलांनी साकोली शाखेतील महिला अभिकर्ता मुख्य जीवन विमा सल्लागार पुजा नरेश कुरंजेकर यांनी आवाहन केले. तसेच योजनेत सहभागी होण्यासाठी वरील फोन ९४०५६७१५०९ संपर्क साधावा असेही त्यांनी सांगितले.

Previous articleभारताच्या लोकशाहीत संविधान अत्यंत महत्त्वाचे — विष्णू जाधव
Next articleसाल्हेर किल्ला परिसरातील दुहेरी खुनाचा पोलिसांनी केला शिताफीने उलगडा
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.