Home जालना भारताच्या लोकशाहीत संविधान अत्यंत महत्त्वाचे — विष्णू जाधव

भारताच्या लोकशाहीत संविधान अत्यंत महत्त्वाचे — विष्णू जाधव

103

आशाताई बच्छाव

1000990463.jpg

भारताच्या लोकशाहीत संविधान अत्यंत महत्त्वाचे — विष्णू जाधव तालुका प्रतिनिधी जाफराबाद-मुरलीधर डहाके
दिनांक 26/11/2024
टेंभुर्णी येथील नवभारत कनिष्ठ महाविद्यालय व श्रीमती जेबीके विद्यालय येथे संविधान दिन साजरा करण्यात आला. संविधान दिनाच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उप मुख्याध्यापक पंजाबराव सोळंके होते. संचालक तथा उपराचार्य प्राध्यापक दत्ताजीराव देशमुख टेंभुर्णीकर, पर्यवेक्षक धनंजय पुराने होते. या कार्यक्रमात इतिहास शिक्षक श्री विष्णू जाधव यांनी मनोगत व्यक्त करताना संविधानाचे महत्त्व सांगितले. हे सांगताना त्यांनी लोकशाहीमध्ये संविधान अत्यंत महत्त्वाचे आहे. त्याचबरोबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान लिहिताना धर्मनिरपेक्ष समाज डोळ्यासमोर ठेवला. संविधानाची कलम संविधानाचे परिशिष्टे या संदर्भात विस्तृत माहिती सांगितली. याप्रसंगी सर्वप्रथम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेचे पूजन केले. त्यानंतर संविधानाच्या प्रस्ताविकेचे सामूहिक वाचन झाले. याप्रसंगी 26 /11/ 2008 झालेल्या हल्ल्यातील मृतात्म्यांना आदरांजली वाहण्यात आली. याप्रसंगी सखाराम बोरकर, भिवसान ससाणे, रमेश इंगळे, प्राध्यापक सुनील बनसोडे, प्राध्यापकअरुण आहेर,प्राध्यापक रामदास भांगे, प्राध्यापक कैलास जाधव, गजानन धोटे, संजय कुलकर्णी, वासुदेव क्षीरसागर, समाधान कांबळे, राजेश शेवाळे, दत्ता उखर्डे, राजेंद्र जगताप, रवींद्र मोरे, गणेश सावंसक्के, आवटी मॅडम, भिलावेकर मॅडम, पाटील मॅडम, कळंबे मॅडम, लंबे मॅडम, राजू डोंबळे, नागोराव देशमुख,दगडोबा तांबेकर, दीपक देशमुख, आदींची उपस्थिती होती.

Previous articleभारतीय संविधान दिनानिमित्त वसमत दिडी व व्याख्यान
Next articleमहिलांना आता मिळणार दरमहा ७०००/- रुपये महिना! काय आहे सखी योजना वाचा सविस्तर
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.