Home विदर्भ भारतीय संविधान दिनानिमित्त वसमत दिडी व व्याख्यान

भारतीय संविधान दिनानिमित्त वसमत दिडी व व्याख्यान

100

आशाताई बच्छाव

1000990456.jpg

भारतीय संविधान दिनानिमित्त वसमत दिडी व व्याख्यान
हिंगोली श्रीहरी अंभोरे पाटील ब्युरो चीफ –हिगोली जिल्ह्यातील विविध ठिकाणी भारतीय संविधान दिनानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
वसमत येथे सकाळी साडेदहा वाजता वसमत नांदेड रोडवरील शहरातील मुख्य रस्त्याने मोठी रॅली काढण्यात आली या रॅलीमध्ये मोठ्या संख्येने महिला व पुरुष जेष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते . सुरुवातीला परभणी नांदेड रोडवरील पूर्णाकृती छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला सलामी करून पुढे
रॅली पुढिल कार्यक्रमाच्या ठिकाणी निघाली यामध्ये महिलांनी हातामध्ये फलक घेऊन संविधान संदर्भातील मोठ्या घोषणा देत नांदेड परभणी रोडवरील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पूर्णाकृती पुतळ्यापर्यंत मोठ्या संख्येने उपस्थित राहून जनजागृती रॅली काढून घोषणा केल्या त्यानंतर नांदेड रोडवरील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पूर्ण कृती पुतळ्यास हार अर्पण करून त्याठाणी सलामी देऊन संविधान उद्देशिकेचे गायन करण्यात आले. हर्ष नगर येथील व्याख्यानाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता त्या ठिकाणी व्याख्यानासाठी नांदेड अशोक भोरे यांनी व्याख्यान केले या ठिकाणी सुभाष भिसे सर . बालाजी मोरे तालुका अध्यक्ष भारतीय बौद्ध महासभा भीमराव कुरडे जिल्हा सरचिटणीस भारतीय बौद्ध महासभा हिंगोली. रामचंद्र वाढे, जिल्हा संघटक भारतीय बौद्ध महासभा हिंगोली वसमत शहराध्यक्ष मेजर भगवान सूर्यकांत सर तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुनील काळे सर यांनी केले तर आभार प्रदर्शन आर एस .नंदसर यांनी केले.

Previous articleप्रबोधनकार कला साहित्य संघटनेच्या वतीने संविधान दिन साजरा
Next articleभारताच्या लोकशाहीत संविधान अत्यंत महत्त्वाचे — विष्णू जाधव
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.