Home जालना शहर जिल्हा काँग्रेसच्या वतीने  स्व.  सावित्रीबाई पगारे यांना भावपूर्ण श्रद्धांजली

शहर जिल्हा काँग्रेसच्या वतीने  स्व.  सावित्रीबाई पगारे यांना भावपूर्ण श्रद्धांजली

123

आशाताई बच्छाव

1000989994.jpg

शहर जिल्हा काँग्रेसच्या वतीने  स्व.  सावित्रीबाई पगारे यांना भावपूर्ण श्रद्धांजली
——————————————————————————————–

जालना दिलीप बोंडे ब्युरो चीफ- जालना नगर परिषदेच्या माजी उपनगराध्यक्ष तथा काँग्रेस पक्षाच्या निष्ठावान कार्यकर्त्या जनसामान्याच्या प्रेरणास्थान आंबेडकर चळवळ गतिमान करणाऱ्या श्रीमती सावित्रीबाई पगारे यांच्या निधनामुळे शहरातील फुले,  शाहू ,  आंबेडकर विचारांची मोठी हानी झाली असल्याचे जालना शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष शेख मेहमूद यांनी स्व. सावित्रीबाई पगारे यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पित करताना आपल्या भावना व्यक्त केल्या .
जालना शहर जिल्हा काँग्रेस कमिटी मंमादेवी स्टेशन रोड पक्ष कार्यालयात दिनांक 25 नोव्हेंबर 2024 सोमवार रोजी स्व. सावित्रीबाई पगारे यांना श्रद्धांजली अर्पित करण्यासाठी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.     कार्यक्रमाच्या प्रारंभी स्वर्गीय श्रीमती पगारे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून भावपूर्ण श्रद्धांजली अर्पित करण्यात आली बैठकीत पुढे बोलताना शेख मेहमूद म्हणाले की स्व.श्रीमती सावित्रीबाई पगारे यांनी आपले संपूर्ण जीवन गोर,  गरीब , झोपडपट्टी आणि कष्टकरी जनतेच्या सेवेमध्ये अर्पित करताना फुले शाहू आंबेडकर या समतेच्या विचारांचा कधी विसर पडू दिला नाही नगरसेवक आणि उपनगराध्यक्ष पदावर काम करीत असताना झोपडपट्टी आणि गरिबांच्या वस्त्यांमध्ये विकास कामे घडून आणण्यासाठी सातत्याने संघर्ष केला होता जनसेवा आणि समतेचे विचार आपल्या जीवनाचा उद्देश ठेवून त्यांनी शहरांमध्ये काँग्रेस पक्षाला बळकट्टी दिली आहे , काँग्रेस पक्ष त्यांच्या कार्याला कधी विसरू शकणार नाही असे भावपूर्ण उदगार शेख मेहमूद यांनी काढले या बैठकीत अब्दुल बासेद कुरेशी,  मंजुताई यादव,  सुरेखा शिंदे, बाबासाहेब सोनवणे, आदी उपस्थित होते.

Previous articleजालन्यात आज घर घर संविधान अभियान
Next article24 वर्षीय तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या; मलकापूर तालुक्यातील घटना
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.