Home जालना जालन्यात आज घर घर संविधान अभियान

जालन्यात आज घर घर संविधान अभियान

92

आशाताई बच्छाव

1000989967.jpg

जालना शहर महानगरपालिका, जालना.
 बातमीपत्र.
घर घर संविधान “.   दिलीप बोंडे ब्युरो चीफ 
 महाराष्ट्र शासन सामाजिक न्याय व विशेष सहाय्य  विभाग व नगर विकास विभाग यांच्या परिपत्रकान्वये. भारतीय संविधानाला 75 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने अमृत महोत्सव म्हणून साल सन 2024 -25 वर्ष “घर घर संविधान “म्हणून  साजरा होणार आहे.
 सदर कार्यक्रमाचाच एक भाग म्हणून जालना शहर महापालिकेच्या वतीने जालना शहरातील सर्व  कुटुंबांना  संविधान उद्देशिका भेट देण्यात येणार आहे. 
 त्याचप्रमाणे जालना शहरातील सर्व शासकीय कार्यालय सर्व सामाजिक संघटनेची कार्यालय सर्व राजकीय पक्षाची कार्यालय यांनाही संविधान उद्देशिका भेट म्हणून महापालिकेच्या वतीने देण्यात येणार आहे. यासाठी  महापालिकेने 60 हजार संविधान उद्देशिका छापल्या आहेत. 
 सदर कार्यक्रमाची सुरुवात आज मा. जिल्हाधिकारी जालना यांना संविधान उद्देशिका ची फोटो फ्रेम भेट देऊन करण्यात आली. त्याचप्रमाणे इतर शासकीय कार्यालयात देखील आज संविधान उद्देशिका भेट देण्यात आल्या महानगरपालिकेच्या 140 अशा सेविका मार्फत देखील प्रत्येक कुटुंबाला उद्या आणि परवा  संविधान उद्देशिका भेट म्हणून देण्यात येणार आहेत. सर्व नागरिकांनी आपापल्या घरात संविधान उद्देशिका लावून त्याची नियमित वाचन करावे. करिता महापालिकेच्या वतीने विनंती करण्यात येत आहे.
 आज मा. जिल्हाधिकारी यांना संविधान उद्देशिका भेट दे त्यावेळी मा.आयुक्त संतोष खांडेकर, अतिरिक्त आयुक्त प्रियंका राजपूत, उपायुक्त नंदा गायकवाड,  सहाय्यक आयुक्त अपर्णा जाधव, सहाय्यक आयुक्त सुप्रिया चव्हाण, इतर अधिकारी कर्मचारी हजर होते.

Previous articleनाफेड च्या माहोरा केंद्रावर शेतकऱ्यांची प्रचंड लूट – कृष्णा लहाने जिल्हाध्यक्ष अभाभ्रनिसं
Next articleशहर जिल्हा काँग्रेसच्या वतीने  स्व.  सावित्रीबाई पगारे यांना भावपूर्ण श्रद्धांजली
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.