Home जालना नाफेड च्या माहोरा केंद्रावर शेतकऱ्यांची प्रचंड लूट – कृष्णा लहाने जिल्हाध्यक्ष अभाभ्रनिसं

नाफेड च्या माहोरा केंद्रावर शेतकऱ्यांची प्रचंड लूट – कृष्णा लहाने जिल्हाध्यक्ष अभाभ्रनिसं

234

आशाताई बच्छाव

1000989929.jpg

नाफेड च्या माहोरा केंद्रावर शेतकऱ्यांची प्रचंड लूट – कृष्णा लहाने जिल्हाध्यक्ष अभाभ्रनिसं
प्रतिनिधी जालना – वसंतराव देशमुख
दिनांक 26/11/2024
याविषयी सविस्तर माहिती अशी की, माहोरा येथील नाफेडचे खरेदी केंद्र चालू असून त्या ठिकाणी शेतकऱ्याकडून १ क्विंटल मागे जवळपास ३ किलो कट्टी लावण्यात येत आहे. चाळणी गाळणीसाठी १५० रुपये घेतले जात आहे. नोंदणीसाठी १०० रुपये घेतले जात आहे. खुलेआम ,शेतकऱ्यांची लूट होत आहे. याकडे शासनाचे पूर्ण दुर्लक्ष आहे, खऱ्या अर्थाने हा सर्व खर्च शासन करीत आहे. परंतु परस्पर नाफेडच्या मनमानी कारभारामुळे शेतकऱ्यांची अतोनात लूट केली जात आहे. तरी मा. जिल्हाधिकारी साहेबांनी याची नोंद घेऊन संबंधित अधिकाऱ्यांच्या काळ्या बाजाराला आळा घालुन भ्रष्ट नाफेडच्या लोकांवर कारवाई करावी किंवा नाफेड केंद्र बंद करण्याचा आदेश द्यावा अशी विनंती शेतकरी करत असल्याचे अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीचे जिल्हाध्यक्ष कृष्णा लहाने यांनी म्हटले आहे.याविषयी माहिती घेऊन त्यांनी सांगितले की,सोयाबीन 3 किलो =150.. चाळणी गाळणी=150. नोंदणी फी 100.=400 रुपये, नाफेड कडून दिल्या जाणारा भाव 4892 प्रतिक्विंटल आणि खुल्या मार्केट मधील भाव 4350 आहे तर मग 142 रुपये साठी नाफेड (शासनाच्या सोयाबीन केंद्रात) सोयाबीन द्यावे की नाही असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे तरी संबंधित अधिकाऱ्यांनी येऊन हे केंद्र बंद करावं अशी विनंती शेतकरी करत असल्याचही लहाने यांनी म्हटले आहे.

Previous articleभरधाव चार चाकी चालवणाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे दुचाकी स्वारांच्या अपघातामध्ये कमालीची वाढ, यावर कोणी लक्ष देईल का? वाहतूक पोलीसांचे दुर्लक्ष
Next articleजालन्यात आज घर घर संविधान अभियान
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.