Home बुलढाणा 24 वर्षीय तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या; मलकापूर तालुक्यातील घटना

24 वर्षीय तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या; मलकापूर तालुक्यातील घटना

127

आशाताई बच्छाव

1000990018.jpg

24 वर्षीय तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या; मलकापूर तालुक्यातील घटना
युवा मराठा न्यूज बुलढाणा जिल्हा ब्युरो चीफ संजय पन्हाळकर
बुलडाणा :-मलकापूर तालुक्यातील झोडगा येथील तरुणाची दोरीच्या साहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज दि 7 मे रोजी सकाळी उघडीस आली. या बाबत सविस्तर वृत्त असे की झोडगा अनुराबाद येथील आकाश अरुण मोरे वय 24 रा. झोडगे याने आज सकाळी 7.30 च्या सुमारास धरणगाव येथील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6 नजीक शेतातील निनु पुजाजी पाटील यांच्या शेतात लिंबाच्या झाडाला दोरीच्या सहाय्याने गळफास घेऊन जीवनयात्रा संपवली. आकाश चे आई वडील मोलमजुरी करून उदरनिर्वाह करतात तसेच आकाश हा एकुलता एक होता. या घटनेचे माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले व पंचनामा करून शरीर मलकापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदना करीता पाठविले. घटनेचा प्राथमिक तपास पोलीस उपनिरीक्षक नरेंद्रसिंह ठाकूर करीत असून पुढील तपास रोकडे हे करीत आहेत.

Previous articleशहर जिल्हा काँग्रेसच्या वतीने  स्व.  सावित्रीबाई पगारे यांना भावपूर्ण श्रद्धांजली
Next articleमोताळ्या तालुक्यातील आडविहिर येथील 21 वर्षीय युवती बेपत्ता
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.