Home जालना राजेवाडीच्या शाळेत विद्यार्थ्यांनी बनविले आकाश कंदील

राजेवाडीच्या शाळेत विद्यार्थ्यांनी बनविले आकाश कंदील

118

आशाताई बच्छाव

1000894847.jpg

राजेवाडीच्या शाळेत विद्यार्थ्यांनी बनविले आकाश कंदील
बदनापूर/जालना दिलीप बोंडे ब्युरो चीफ: काही दिवसांवर दिवाळी सण येवून ठेपला असून त्यानिमित्त बदनापूर
तालुक्यातील राजेवाडी (खो)येथील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांची
आपली कलाकृती सादर करुन दिवाळीनिमित्त आकाश कंदील बनवून त्याचे शाळेत
प्रदर्शन भरविण्यात आले होते.
जिल्हा परिषद शाळा राजेवाडी (खो) केंद्र खामगाव येथे इयत्ता ७ वी व ८ वी
च्या विद्यार्थ्यांनी आकाश कंदील बनवले. ग्रामीण व डोंगराळ भागातील
विद्यार्थी येथे शिक्षण घेतात. या विद्यार्थ्यांकडून या शाळेतील
उपक्रमशील शिक्षिका संगीता जेम्स गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली
विद्यार्थ्यांना विविध व्यक्तिविकासाचे धडे दिल्या जातात. दिपावलीनिमित्त
त्यांनी विद्यार्थ्यांकडून टाकाऊ वस्तूपासून टिकाऊ असे आकाशकंदील बनवून
घेतले. शिक्षकाच्या उपक्रमाचे व विद्यार्थ्यांचे कलेचे गावकर्‍यांनी व
पालकांनी कौतुक केले आहे.
००००००००
फोटो ओळी…..
२- राजेवाडी (खो)येथील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांची आपली
कलाकृती सादर करुन दिवाळीनिमित्त आकाश कंदील बनविण्यात आले

Previous articleदेहेड/दानापुर येथे आनापान ध्यान साधना संपन्न ..
Next articleजालना विधानसभेची लढत ही धनशक्ती विरुद्ध जनशक्ती
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.