Home जालना जालना विधानसभेची लढत ही धनशक्ती विरुद्ध जनशक्ती

जालना विधानसभेची लढत ही धनशक्ती विरुद्ध जनशक्ती

115

आशाताई बच्छाव

1000894849.jpg

जालना (दिलीप बोंडे ब्युरो चीफ) जालना विधानसभेची लढत ही धनशक्ती विरुद्ध जनशक्ती अशी होणार आहे. आपण जनशक्तीचे उमेदवार असल्यामुळे शक्ती प्रदर्शन करून काय करणार असा सवाल उपस्थित करत मतदान आपल्यालाच पडणार आणि विजय आपलाच होईल असा ठाम विश्वास आ.कैलास गोरंटयाल यांनी आज येथे पत्रकारांशी बोलतांना व्यक्त केला.
जालना विधानसभा मतदार संघातून महाविकास आघाडीच्या वतीने आ.कैलास गोरंटयाल आणि माजी नगराध्यक्षा सौ.संगीताताई गोरंटयाल यांनी आज गुरुवारी दुपारी जालन्याचे उपविभागीय अधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी श्रीमंत हरकर आणि तहसिलदार तथा सहाय्यक निवडणूक अधिकारी श्रीमती छाया पवार यांच्याकडे आपले नामनिर्देशनपत्र दाखल केले. यावेळी महेश सारस्वत, विजय चौधरी, दीपक भुरेवाल, महावीर ढक्का, सागर चिलका, विनोद यादव, राजेश पवार आदींची उपस्थिती होती. उमेदवारी दाखल केल्यानंतर उपस्थीत पत्रकारांशी बोलतांना आ. कैलास गोरंटयाल म्हणाले की, आज आपण नामनिर्देशनपत्र दाखल केले आहे. पक्षाकडून एबी फॉर्म लवकरच मिळणार असून तो प्राप्त झाल्यानंतर महाविकास आघाडीतील सर्व घटक पक्षातील नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना सोबत घेऊन आणखी नामनिर्देशनपत्र दाखल करणार आहे. तुमच्या प्रतिस्पर्धी उमेदवारांनी विजयाचा दावा केल्याचे पत्रकारांनी निदर्शनास आणून दिले असता ते म्हणाले भास्कर दानवे यांनी सुद्धा अर्ज दाखल केला आहे. त्यामुळे ही लढत धनशक्ती विरुद्ध जनशक्ती अशी होणार आहे. जितके जास्त उमेदवारी अर्ज दाखल होईल तितकी मोठी लीड मला राहील असे स्पष्ट करून विजयाची खात्री तर आपल्याला पहिल्या पासूनच आहे. कारण ज्या दिवशी मी आमदार झालो. फक्त काम केले, आणि ठोक काम केल्याचे जनतेला दाखवून दिले. पाण्याचे काम ठोक झाले, मेडिकल कॉलेजचे काम ठोक झाले, रस्ते, नाल्या आणि इतर विकासाची अशी किती तरी काम केलेली आहेत.

Previous articleराजेवाडीच्या शाळेत विद्यार्थ्यांनी बनविले आकाश कंदील
Next article१०१ जालना विधानसभा मतदारसंघातून अपक्ष उमेदवार भास्कर मुकुंदराव दानवे यांचा उमेदवारी अर्ज दाखल
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.