आशाताई बच्छाव
देहेड/दानापुर येथे आनापान ध्यान साधना संपन्न .. तालुका प्रतिनिधी जाफराबाद जालना – मुरलीधर डहाके…
आज दि. 26/10/2024 वार शनिवार रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा देहेड केंद्र- दानापूर
ता-भोकरदन
जि-जालना येथे विद्यार्थ्यांना विपश्यना परिचय व दहा मिनिटे आनापान ध्यान साधना घेण्यात आली.नियमित ध्यान साधना केल्याने *मनाची एकाग्रता वाढते*, ताण तणावातून मुक्तता मिळते, मन शांत होते, आनंदी होते, मनातील भिती, काळजी कमी होते, आसक्ती, द्वेष कमी होतो, उत्साह, सकारात्मकता वाढते, स्मरणशक्ती वाढते, भावनिकता आणि चांगले संबंध वाढतात, व्यसनमुक्ती कमी होते असे अनेक फायदे होतात. *असे श्री अण्णा पाटील इंगळे जिल्हा समन्वयक आनंदी गाव प्रकल्प* यांनी मार्गदर्शन केले तसेच विद्यार्थ्या बरोबर शिक्षक, पालक यांनी सुद्धा दहा मिनिटे आनापान ध्यान साधनेचा अभ्यास केला, याप्रसंगी या शाळेचे माजी मुख्याध्यापक आर्यन इंगळे सर, डॉ. जनार्धन जाधव, ग्राम पंचायत सदस्य श्री जगन जाधव, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री प्रभाकर बावस्कर उपस्थित होते.
शाळेचे मुख्याध्यापक श्री डी. बी.ठाकरे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेतील शिक्षक श्री
आर. आर.बावस्कर.
श्री बी. ए.रगडे, श्री डी. ए. भानुसे,
श्री पी. जी. माळी, श्रीमती एस. डब्लू. बोर्डे, श्रीम. जी . जे. जाधव यांनी परिश्रम घेतले.श्री पी.जी. माळी यांनी आभार प्रदर्शन केले.






