आशाताई बच्छाव
मौजा पाथरी टोला वस्तीतील गट क्र.५५३ मधील अतिक्रमण हटविण्यास दिवाणी न्यायालय, क.स्तर पवनी कडून स्थगिती चे आदेश.
संजीव भांबोरे
भंडारा( जिल्हा प्रतिनिधी) सविस्तर वृत्त असे की,मौजा पाथरी पुनर्वसन येथील पाथरी टोला वस्तीमधील गट क्र.५५३ मधील श्री.प्रभाकर नागपुरे यांनी रहात असलेले जुने घर अगदी दोन रूमचे असल्याने व ते घर पूर्णतः मोडकळीस आल्याने गट क्र.553 मध्ये कर्ज काढून घर बांधलेले आहे.आणि सहा – सात महिने पासुन त्या घरात आपले पुर्ण परिवार सहित रहात आहेत. पाथरी टोला हि वस्ती पूर्ण अतिक्रमण करून या गावातील जनता रहात आहेत.आणि शासनाकडून मिळत असलेले घरकुल योजने अंतर्गत भरपूर या वस्तीत अतिक्रमण जागेवर घरकुल चे बांधकाम करून लोकं राहत आहेत.ज्या जागेवर श्री.प्रभाकर नागपुरे यांनी घराचे बांधकाम केले आहे.याच जागेवर घरकुल आणि इतर लोकांनी घराचे सुद्धा बांधकाम करून लोकं रहात आहेत.परंतु बाकी च्या अतिक्रमण केलेल्या लोकांना अतिक्रम हटविण्याचे नोटीस सरपंच कडून न देता फक्त चिरीमिरी न जमल्यामुळे श्री.प्रभाकर नागपुरे यांनाच भेदभावपुर्ण व बेकायदेशीर नोटीस दिले.दिनांक 11/06/2024 ला पहिले सरपंच सौ.पल्लवी समरीत यांनी ग्रामपंचायत पाथरी पुनर्वसन मधील ग्रामपंचायत मध्ये मासिक सभेचा ठराव किंव्हा ग्रामसभेचा ठराव न घेता स्वतःच्या स्वाक्षरीने नोटीस दिला.नोटीस देताना हे नोटीस सचिवांनी देणे आवश्यक असताना सुद्धा सरपंच यांना अधिकार नसतांना बेकायदेशीर पदाचा दुरुपयोग करून मनमानी कारभार करून नोटीस दिले.553 गटात ज्या जागेवर अतिक्रमण श्री.प्रभाकर नागपुरे यांनी बांधकाम केले त्या बांधकामा समोर कित्तेक वर्षापासून लोकांनी तनसीचे ढग ठेवलेले आहेत.हि जागा क्रीडांगनासाठी राखीव आहे असे सरपंच कडून सांगण्यात येते.ती माहिती पूर्णतः चुकीची माहिती सरपंच कडून सांगण्यात येत आहे.553 गट हि जागा ग्रामपंचायत ची जागा नाही.तर ती महसूल विभागाची आहे.त्यामुळे या जागेवरील अतिक्रमन हटविण्याचे अधिकार ग्रामपंचायत ला नाही.
सरपंच नी घेतलेल्या पत्रकार परिषद मध्ये ज्या लोकांनी स्टेटमेंट दिलेले आहे.ते सगळे लोकं सुध्दा सरकारी जागेत अतिक्रमण करून राहत आहेत.तसेच विद्यमान ग्रा. प.सदस्य सौ.सविता गोपाल मारबते यांनी सुद्धा सरकारी जागेत बेकायदेशीर घरकुलचे बांधकाम केले आहे.तसेच विद्यमान उपसरपंच श्री.हरिहर श्रीकृष्ण नागपुरे,तसेच सौ.सुनीता उमाजी देशमुख,ज्योत्स्ना धम्मानंद बोरकर यांचे पण अतिक्रमनकरून बांधकाम केले आहे. हे शासनाची दिशाभूल करून निवडणूक लढलेले असल्याने विद्यमान ग्रां. प.सदस्य श्री.नंदलाल तु. भुरे यांनी मा. जिल्हाण्याय दंडाधिकारी तथा जिल्हाधिकारी यांचे कडे तक्रार दिलेली आहे.
ग्रामपंचायत नी दिनांक 04/10/2024 ला विशेष मासिक सभा घेऊन मा.तहसीलदार व मा.गट विकास अधिकारी यांच्या पत्राला केराची टोपली दाखवून दिनांक 14/10/2024 ला अतिक्रमण हटविण्याचे नोटीस देण्यात आले.यावर पिढीत श्री.प्रभाकर नागपुरे यांनी मा.दिवाणी न्यायालय क.स्तर पवनी येथे या नोटीस च्या विरोधात स्टे करिता अर्ज केला होता.त्या अर्जातील सगळे पुरावे बघून मा.न्यायालय यांनी दिनांक 10/10/2024 ला अतिक्रमण हटविण्याबाबद मनाई आदेश दिलेला आहे.त्यामुळे ऐका गरीब,पिढीत वंचित वेक्तिला न्याय मिळाला आहे.त्यामुळे आज अन्याय करणारा कितीही मोठ्ठा वेक्ती असला तरी न्याय मिळते हे या आदेशावरून सामान्य माणसाला दिलासा देणारा निर्णय ठरलेला आहे.