Home सामाजिक आयुष्याचा प्रवास जीवनाचा धडा

आयुष्याचा प्रवास जीवनाचा धडा

18
0

आशाताई बच्छाव

1000687455.jpg

⏺ आयुष्याचा प्रवास जीवनाचा धडा ⏺ 👆 आज थोडस मनमोकळ व मन हलक होईल अस बोलावस वाटल म्हणून हे हितगुज…मी जन्माला आलो तेव्हा माझ्याजवळ होत तरी काय ? फक्त श्वास… नाव तर नंतर झाले , जेव्हा समजायला लागले ! पण हे जीवन जगताना नको तेवढा संघर्ष करावा लागला. पावलोपावली ठोकरी खाऊन अपमानाचे घोट गिळत जगावे लागले.तरीही मी नेमका का कुणासाठी जगत राहिलो ? या प्रश्नाचे उतर मला अजून तरी मिळाले नाही. फक्त वेडयासारख जगत राहिलो. अमका माझा फलाना माझा हे मोठ्या कौतुकाने लोकांसमोर सांगत राहिलो.पण खरे अर्थाने कोण माझे ? हे आजपर्यंतसुध्दा कळू शकले नाही. जीवन काय असते आणि त्याचे चटके कसे बसतात याचा भयानक अनुभव पदरी घेऊन जगण्याची लढाई लढण्यासाठी वाटचाल करीत राहिलो.पुढे मात्र माझ्या पत्रकारितेच्या क्षेत्रात सुरु असलेल्या कामगिरीमुळे मी दिन दुःखी गोरगरीब सगळ्यांच्याच कामी आलो. आपल म्हणून सगळ्यांसाठी धावत राहिलो. माझ्या अमूल्य अशा वेळेचा कधी विचारही केला नाही .फक्त आणि फक्त सन्मार्गाच्या दिशा दाखवून आजच्या जीवनात कशाला महत्त्व द्यावे याचे मार्गदर्शन करीत आलो. कधी कुणाच्या लहान मुलाबाळांना वाईट वळण लावून बिघडविले नाही. प्रत्येक स्त्री मध्ये आपलीच आई आणि बहिण शोधण्याचा पुरेपूर प्रयत्न केला. तरीही आयुष्यातील या प्रवासात तुम्ही काय कमावले? आणि काय गमावले ? याचा जर हिशोब करायला तुम्ही बसाल तेव्हा लोक फक्त तुमचा वापर तोंडावर कौतुक करण्यापुरताच करतील.. हा इतिहास आहे ! जेथे वाल्या कोळीने ज्या कुटूंबासाठी वाटमारी केली ते तरी त्यांच्या शेवटी सोबत होते का ? या प्रश्नाचे उतर अखेरपर्यत कुणीच सोडवू शकलेले नाही.तरी देखील हा मोह मायेचा बाजार गोम्या माझा सोम्या माझा वगैरे आपण जे म्हणतो. ते तरी कितपत खरे असते. सगळीच मतलबाची दुनिया असती याचा अजूनही विचार होणे गरजेचे आहे. आजच्या जमान्यात भाऊ बहिणीला विचारीनासा झालाय…मुलाना आईबापाचे कौतुक राहिले नाही . आईबाप कुठे तरी वृध्दाश्रमात शेवटच्या घटका मोजताना दिसतात .कालपर्यत श्रीमंतीचा माज आलेले नातेवाईक आपल्याला विचारीत नव्हते. मग ते आजच आपल्याला कसे डोक्यावर घ्यायला निघालेत. हा सारा मायेचा बाजार आहे…. ज्या व्यक्तीला आपण जीवंतपणी सुख देऊ शकत नाही, माणूसकी दाखवून आपूलकीने वागवू शकत नाही ,त्याने अखेर शेवटच्या प्रवासावेळी कितीही कौतुक केले देखावा केला तरी त्याला किंमत राहत नाही. कारण प्रत्येकाला एक दिवशी शेवटच्या प्रवासाला जायचेच आहे.त्यामुळे तुम्ही किती अब्जाधिश आहात. तुमचे किती बंगलेआहेत. किती गाड्या आहेत . किती बँकबँलन्स आहे या सगळ्या गोष्टीना कुणीही विचारत नाही.तुम्ही जे आज हवेत उडतात त्याला काही एक महत्त्व राहिलेले नाही .हवेवर व अभिमानाने गर्वाने उडणारेनी एकदा जरुर स्मशानभुमीचा चक्कर मारुन यावा अनेकांची चिमटीभर झालेली राख येथे बघायला मिळेल. त्यामुळेच शेवटच्या प्रवासाला जाणाऱ्या व्यक्तीबद्दल त्यावेळी चांगले बोलण्यापेक्षा आताच त्याचेशी प्रेमाने वागा,माणूसकी दाखवा, मुलांना सुसंस्कृत बनवा परिश्रम व कष्टाचे महत्त्व समजावून सांगा… अन्यथा एक दिवशी हे नक्कीच घडणार आहे… आपण ज्यांच्यासाठी राबराब राबलो त्यांनी आपण मेल्यानंतर कितीही अश्रु गाळले तरी ते बघावयास आपण राहणार नाही ..म्हणजे उड जायेगा एक दिन पंछी रहेगा पिंजरा खाली.. यापेक्षा आणखी वेगळे काय सांगावे.. ➡ स्वप्निल देशमुख ( पत्रकार)
वानखेड बुलढाणा 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here