आशाताई बच्छाव
स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांची १४२ जयंती
१८८३मध्ये २८मे रोजी नाशिक जिल्ह्यातील भगुर यागावात दामोदरपंत व राधा आईच्या पोटी भारताला नवीन नाविन्यपूर्ण दिशा देणारा प्रखर राष्ट्रभक्त जन्माला आला. ते म्हणजे स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर होय.त्यांचे मोठे बंधु बाबाराव व धाकटे नारायणराव. सावरकर ९वर्षाचे असताना राधा आइचे निधन झाले पुढे सावरकराचा संभाळ सौ.येसु वहिनी बाबाराव सावरकर यांनी केला. जन्मल्यापासुन सावरकर उच्च विचाराचे होते ते १३वर्षाचे असताना स्वदेशीचा फटका व स्वातंत्र्याचे स्तोत्र या रचना केल्या.१९०१मध्ये यमुनाबाईशी विवाहा झाला.१९०२साली फग्य्रुसन महाविद्यालयात बी.ए.ला प्रेवश घेतला.१९०६साली श्यामजी कृष्ण वर्मा यांनी ठेवलेल्या शिवाजी शिष्यवृर्ती टिळकाच्या शिफारसीने मिळाली व उच्च शिक्षण घेण्यासाठी इंग्लंडना गेले.१९९९ मध्ये राष्ट्रभक्त समृहा संघटनेची गृप्त स्थापना केली. पुढे मित्रमेळा ही संघटना स्थापन केली हिच राष्ट्रभक्त समृहाची प्रकट शाखा होती. १९०४मध्ये मित्रमेळाचे नाव अभिन्व भारत ठेवले.१९०५साली विदेशी कपड्याची होळी केली याद्वारे प्रथमच स्वदेशीचा नारा देण्यात आला.इंग्लंड मध्ये राहात असताना जोशे म्यधनीच्या आत्मचरित्राचे मराठी भाषांतर केले. याभाषांतराच्या जोडलेल्या प्रस्तावनेत सशस्त्र क्रांतीचे तत्वज्ञान प्रगट केले.याच काळात सावरकरांनी विवधदेशाच्या क्रांतिकारकाशी संपर्क करून बाॅम बनवण्याचे तंत्र आत्मसाध केले.हे तंत्रज्ञान व २२पिस्तूल त्यांनी भारतात पाठवले,यातील एका पिस्तूलाने नाशिकचा कलेक्टर जाॅकसन याचा अनंत कान्हेरे या सोळा वर्षाच्या युवकाने वध केला. सावरकरांनी १८५७चे स्वातंत्र्य समर हा ग्रंथ लिहिला व तो प्रकाशाच्या आत इंग्रांजानी जप्त केला,परंतु सावरकरांच्या साथीदाराने कसेबसे या ग्रंथाच्या इंग्रजी आवृतीला प्रसिद्ध केले.राजद्रोहपर लिखाण केल्या प्रकरणी सावरकरांचे धोरले बंधु बाबाराव सावरकर यांना जन्मठेपेची शिक्षा देऊन काळ्या पाण्यावर धाडले. या घटनेचा बदला म्हणून लण्डन मध्ये मदनलाल डिगरा यांनी करजर्न वाएली ला गोळ्या मारल्या.सर्वाचा मुख्यसूत्रधार विनायक सावरकर असल्याचे समजल्यावर ब्रिटिश शासनाने लण्डन मधुन तात्काळ अटक केली १९१०साली त्यांना समुद्र मार्गाने भारतात आणले जात असताना त्यानी बोटीतून उडी मारली व पोहत जाऊन ब्रिटनचा किनारा गाठला पण भाषेमुळे तेथे कोणालाच सावरकराचे म्हणे कळले नाही व ब्रिटिश सरकारने त्यांना पुन्हा अटक केली.सन१९११मध्ये सावरकरांना दोन जन्मठेपेची शिक्षा देऊन काळ्या पाण्याची शिक्षा देण्यात आली. त्यांनी ७बाय १२च्या खोलीत मरणप्रर्य यातना सहन केल्या.व तेथे कोळु चालवून,नारळाच्या शेड्याचा कात्या कुटून आपले कवित्व तयार केले व तेथे भिंतीवर लिहून पाठ करून पुसुन पुन्हा दुसरे कवित्व तयार करत आसा नेम सलग आकरा वर्ष चालवला.सन १९२४मध्ये काही अटीशर्थीवर आपली सुटका करून घेतली.पुढे रत्नागिरी तेथे त्याना स्थानबंध करण्यात आले व तेथे मागील अकरा वर्षातील कवित्व आठवून ते पुन्हा लिहिले.पुढे हिंदूना एकत्रीकरणाचे कार्य केले भारतातील वर्ण व्यवस्था,अंधश्रद्ध यावर लेखान व कार्य केले,अंतरजातीय विवाह लावले जवळपास पाचशे मंदिरे अस्फुर्षासाठी खुली केली,जातीभेद तोडण्यासाठी त्यांनी सहभोजनाचा तडाकाच उडवला होता.सर्व जाती-धर्मातील लोकांसाठी त्यांनी पतितपावन मंदिराची स्थापन केले.त्यांनी या तेरा वर्षाच्या रत्नागिरीच्या स्थानबंधतेत हिंदूचिक्कीसेचे कार्य केले.ते एका ठिकाणी म्हणतात मी आज जो विचार पेरत आहे तो तुम्हाला आज मान्य होणार नाही तो तुम्हाला २५-५०वर्षांनी मान्य होईल.ते फक्त क्रांतीकारकच नव्हते तर ते एक जवलत साहित्यिक, थोर समाजसुधारक,थोर राजकारणी,हिंदूसंघटक,बुध्दीवादी,विज्ञाननिष्ठ,राष्ट्रभक्त होते.स्वातंत्र्य लढ्यात त्यांचे योगदान खुप महत्त्वाचे होते.त्यांनी आपल्या जीवनात पनास पेक्षा अधिक ग्रंथाचे लेखन केले व कमळ,सागरा प्राण तळमळला,जयत्युते सारख्या रचना सिध्द आहे.सावरकर हे विलक्षण बुद्धीमतेचे होते. सावरकर हे अभ्यासन व अनुभवण्याचे आहे. अशा महान राष्ट्रभक्ताला जयंती निमित्ताने विनम्र अभिवादन.
शब्दांकन- वैराग्यपाईक ह.भ.प ज्ञानेश्वर माऊली ठाकरे धामोरी (कोपरगाव)






