Home नांदेड पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 300 व्या जयंतीनिमित्त 300 पुतळे देऊन करणार सन्मान...

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 300 व्या जयंतीनिमित्त 300 पुतळे देऊन करणार सन्मान **************************

141

आशाताई बच्छाव

1001542882.jpg

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 300 व्या जयंतीनिमित्त 300 पुतळे देऊन करणार सन्मान
**************************
300बालाजी पेटेकर यांचा स्तुत्य उपक्रम
**************************
मराठवाडा विभागीय संपादक मनोज बिरादार
बहुजनांच्या उद्धारक,महिलांच्या हातात प्रथमच तलवार देऊन महिलांची फौज निर्माण करणाऱ्या रणरागिणी,28 वर्षे राज्यकारभार करून भारताच्या इतिहासात एकमेव महिला राज्यकर्त्या ठरलेल्या पुण्यश्लोक महाराणी अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जन्मोत्सवा निमित्य 300 व्या जयंतीचे औचित्य साधून 300 पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्यांचे भेट देऊन सन्मान करण्यात येणार आहे. सामाजिक कार्य करणारे,गुणवंत विद्यार्थी व विविध स्पर्धेमध्ये प्राविण्य मिळवलेल्या गुणवंतांना पुतळे देऊन सन्मान करणार असे बालाजी पेटेकर यांनी नुकतीच माहिती दिली. स्वतः शिल्पकार,चित्रकार असलेल्या बालाजी पेटेकर यांनी स्वतः ह्या पुतळ्याचे मॉडेल बनवले असून सामाजिक सेवेच्या भावनेतून हा उपक्रम त्यांनी हाती घेतला आहे.महाराणी अहिल्यादेवीचा पुतळा समोर ठेवून त्यांचा आदर्श,मानवतावादी दृष्टिकोन, सर्व समाजाप्रती असलेली समाजोनतीची तळमळ,निस्वार्थ सामाजिक कार्याचा वसा त्यांच्या पुतळ्यातून ही प्रेरणा मिळावी हा त्यांचा हेतू .अहिल्यादेवी होळकर यांची 300 वी जयंती वर्षभर महाराष्ट्रा सह इतर राज्यातही मातोश्री अहिल्यादेवी होळकर त्रिशताब्दी जन्मोत्सव मोठ्या दिमाखाने हर्ष उल्हासात साजरा करण्यात येत आहे.या त्रिशताब्दी जन्मोत्सव वर्षानिमित्त विविध ठिकाणी विविध जिल्ह्यात विविध तालुका पातळीवर,वेगवेगळे उपक्रम राबवले जात आहेत. या सामाजिक उपक्रमातून महामानवांचे विचार प्रत्येकाच्या घराघरात पोहोचावे या उद्देशाने विविध उपक्रम राबवण्यात येत आहेत.त्यापैकी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे कार्य विचारधारा सर्व स्तरापर्यंत जावी म्हणून बालाजी पेटेकर खतगावकर यांनी समाजसेवकासह 300 व्या जयंतीनिमित्त 300 पुतळे देऊन सन्मान करण्याचे ठरवले आहे. त्यांच्या या निस्वार्थ भावनेतून करण्यात येणाऱ्या समाजपयोगी उपक्रमाचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.