Home जालना शेतकऱ्यांना सतीश घाटगे यांनी  मिळवून दिला हक्काचा रोजगार

शेतकऱ्यांना सतीश घाटगे यांनी  मिळवून दिला हक्काचा रोजगार

106

आशाताई बच्छाव

1000687405.jpg

शेतकऱ्यांना सतीश घाटगे यांनी  मिळवून दिला हक्काचा रोजगार
—–
यावल पिंपरीच्या शेतकऱ्यांना  ३५ टक्के अनुदानावर गाड्यांचे वाटप  
जालना,(दिलीप बोंडे ब्युरो चीफ)
अंबड सुशिक्षित बेरोजगारांना तसेच शेतकऱ्यांना आर्थिक दृष्ट्या समृध्द करण्यासाठी  सतीश घाटगे यांच्या प्रयत्नातून शेतमाल वाहतुकीचा व्यवसाय करण्यासाठी मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमातून वाहने उपलब्ध करून देण्यात येत आहे.यावल पिंपरी येथील कारभारी उगले व यावल पिंपरी तांडा येथील  शिवाजी राम राठोड यांना मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमातून ३५ टक्के अनुदानावर शेतमाल वाहुतुकीच्या व्यवसायासाठी वाहने उपलब्ध करून देण्यात आली.

गेल्या सात महिन्यापासून हा कार्यक्रम घनसावंगी विधानसभा क्षेत्रात सतीश घाटगे यांच्या सहकार्यातून राबविल्या जात आहे. या कार्यक्रमातून आतापर्यंत ३० लाभार्थींना शेतमाल वाहतुकीचे वाहने मिळवून देण्यात आली आहे. या वाहनामुळे   अनेक युवकांना हक्काचा रोजगार  मिळाला आहे. यावेळी आनंद बामणे, गणेश टकले यांची उपस्थिती होती.

Previous articleफॅन्ट्सी किड्स झोन प्री-मायमरी स्कुल दहीहंडी कार्यक्रम उत्साहात
Next articleडॉ. प्रशांत फदाट यांना पी.जी. मध्ये उत्कृष्ठ रँक मिळाल्या बद्दल सत्कार ..
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.