Home बुलढाणा पुरातन शिव मंदिर धोत्रा नंदई येथे भक्तांची मांदियाळी….

पुरातन शिव मंदिर धोत्रा नंदई येथे भक्तांची मांदियाळी….

119

आशाताई बच्छाव

1000659430.jpg

पुरातन शिव मंदिर धोत्रा नंदई येथे भक्तांची मांदियाळी….
युवा मराठा न्यूज बुलढाणा जिल्हा ब्युरो चीफ संजय पन्हाळकर

देऊळगाव राजा :-बुलढाणा चिखली वरून फक्त ३३ किलोमीटर अंतरावर धोत्रा नंदई हे गाव आहे. बुलढाणा जिल्ह्यातील देऊळगाव राजा तालुक्यातील सुमारे २ हजार लोकसंख्या असलेले हे गाव. या गावात ३ सुंदर अशी प्राचीन हेमाडपंथी स्थापत्यशैलीचे शिवमंदिरे आहेत. तीनही मंदिराचे प्रवेश द्वार पूर्वेकडेच आहे.
हा १२ व्या शतकातील ३ शिव मंदिराचा समूह चालुक्य काळातील असून अशा प्रकारचा मंदिर समूह फारसा दिसत नाही. महत्वाचे म्हणजे ही मंदिरे गावाच्या ३ दिशेला त्रिकोणी स्थितीमध्ये आहेत. ती तशी का आहेत हा औत्सुक्याचा विषय आहे. त्यामुळे येथे शिव भक्तांची वर्दळ असते.
या तीन मंदिरापैकी दोन मंदिरे गावात आहेत तर तिसरे गावाबाहेर एका शेतात आहे. आज गावाबाहेरील तिसरे मंदिर बघुया. मंदिर पुरातत्त्व विभागाच्या अखत्यारित आहे. धोत्रा नंदई मधील तीन मंदिरापैकी सर्वात सुंदर मंदिर हेच आहे. उत्कृष्ट कोरीव काम आणि वास्तुकलेचा उत्तम नमुना असलेले हे मंदिर आहे. इतर दोन मंदिराप्रमाणेच या मंदिराची पण थोडीफार पडझड झालेली आहे. मंदिराच्या जवळच एक पुरातन बारव आहे पण सध्या बारवेची दुर्दशा झालेली आहे.
श्रावण महिन्यात या ठिकाणी भक्तांची मांदियाळी असतें

Previous articleउरण जासई येथील खुनाचा उलगडा; पत्नीच्या प्रेम संबंधातून मित्राची हत्या !
Next articleशेतात काम करायला गेलेल्या महिलेच्या अंगावर वीज पडून महिला ठार.
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.