आशाताई बच्छाव
शेतात काम करायला गेलेल्या महिलेच्या अंगावर वीज पडून महिला ठार.
युवा मराठा न्यूज बुलढाणा जिल्हा ब्युरो चीफ संजय पन्हाळकर
म्हैसवाडी:- मलकापूर तालुक्यात गेल्या दोन-तीन दिवसांपासून पावसाने खंड दिल्याने रविवारी शेतकरी, मजूर वर्ग मशागतीसाठी शेतात गेले होते. शेतातून घरी परतण्याच्या तयारीत असतानाच अचानक २ वाजता विजेत्या कडकडाटासह मुसळधार पावसाला सुरुवात झाली. शेतामध्ये काम करत असलेल्या दोन महिला पावसापासून संरक्षणासाठी झाडाखाली गेल्या.
त्याच झाडावर वीज पडल्यामुळे पुष्पा प्रभाकर राणे (५५), (रा. म्हैसवाडी) यांचा जागीच मृत्यू झाला. तर योगिता विनोद किंनगे (४५) (रा. म्हैसवाडी) ही महिला जखमी होऊन बेशुद्ध पडली. माहिती मिळाल्यानंतर शुभम लाहुळकर यांनी खासगी वाहनाने उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालय मलकापूर येथे ताबडतोब पोहोचवले.
तसेच पोलिस पाटील योगेश पाटील यांनी दसरखेड पोलिस ठाण्याचे निरीक्षक हेमराज कोळी, तहसीलदार राहुल तायडे, मंडळ अधिकारी वानखेडे, तलाठी कौशल महाजन, अॅड. हरीश रावळ यांना माहिती दिली. रावळ यांनी तत्काळ रुग्णवाहिका उपलब्ध करून दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन महिलेचा मृतदेह शवविच्छेदनासाठी






