Home रायगड उरण जासई येथील खुनाचा उलगडा; पत्नीच्या प्रेम संबंधातून मित्राची हत्या !

उरण जासई येथील खुनाचा उलगडा; पत्नीच्या प्रेम संबंधातून मित्राची हत्या !

97

आशाताई बच्छाव

1000659428.jpg

उरण जासई येथील खुनाचा उलगडा; पत्नीच्या प्रेम संबंधातून मित्राची हत्या !

युवा मराठा न्यूज रायगड ब्यूरो चीफ :- मुजाहीद मोमीन

आपल्याच मित्राशी पत्नीचे जुळलेल्या प्रेम संबंधामुळे संतप्त झालेल्या पतीने मित्राचा डोक्यात दगड घालून निघृणपणे हत्या केली. इतक्यावर न थांबता त्याने मित्राचा मृतदेह प्लास्टिकच्या गोणीत घालून काळोखात फेकून दिल्याची घटना जासईत घडल्या चे उघडकीस आले आहे. यामुळे उरण तालुक्यासह जासई परिसरात खळबळ उडाली आहे.

आरोपी बालगंधर्व रामचंद्र गोडस (४२) आणि दत्तात्रेय महादेव बुटूकडे (४०) हे दोघेही विरली-सातारा गावचे रहिवासी आहेत. दोघेही चालक म्हणून एकाच कंपनीत काम करीत असल्याने त्यांच्यात मैत्रीचे संबंध होते.

आरोपी बालगंधर्व गोडस आपल्या पत्नीसह तर दत्तात्रेय बुटूकडे उरण तालुक्यातील जासई गावातच भाड्याच्या घरात वेगवेगळ्याठिकाणी राहात आहेत. आरोपी बालगंधर्वशी मैत्रीचे संबंध असल्याने मयत दत्तात्रेय याच्या घरी येणे जाणे होते. यादरम्यान आरोपीच्या पत्नीशी दत्तात्रेयचे प्रेमसंबंध जुळले होते. काही दिवसांनंतर पत्नी आणि मित्रांमध्ये सुरू असलेल्या प्रेमप्रकरणाची कुणकुण पतीला लागली. यामुळे बऱ्याच दिवसांपासून मनातुन
बैचेन व संतापलेल्या आरोपी बालगंधर्वने दत्तात्रेयचा काटा

काढण्यासाठी संधी शोधत होता. आरोपी बालगंधर्वने दत्तात्रेयचा काटा काढायचा बेत आखला आणि त्याला जेवायला घरी बोलावले. रात्री जेवण झाल्यानंतर अंगात सैतान शिरलेल्या आरोपी बालगंधर्वने दत्तात्रेय याच्या डोक्यावर दगड टाकून निघृणपणे हत्या केली.

विशेष म्हणजे पत्नीच्या मदतीने दत्तात्रेयचा मृतदेह प्लास्टिकच्या गोणीत भरून नजीकच्याच शाळेतील शौचालयाच्या बाजूला असलेल्या गवतात टाकून दिला. सकाळी प्लास्टिकच्या गोणीत काहीतरी संशयास्पद असल्याची बाब नागरिकांच्या निदर्शनास आली. त्यानंतर त्यांनी पोलिसांना खबर दिली. खबर मिळताच उरण पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. प्लास्टिकची गोणी उघडून पाहताच त्यामध्ये पुरुषाचा मृतदेह आढळला. मृतदेह ताब्यात घेतल्यानंतर पोलिसांना संशयित आरोपीचा सुगावा लागला. पोलिसांनी आरोपी बालगंधर्व व त्याची पत्नी चांगुणा यांना ताब्यात घेऊन अटक केली असल्याची माहिती न्हावाशेवा बंदर विभागाचे सहाय्यक पोलिस आयुक्त डॉ. विशाल नेहूल यांनी दिली आहे.

Previous articleकला व वाणिज्य महाविद्यालय वरवट बकाल येथे प्राणिशास्त्र विभागात अभ्यास मंडळाची स्थापना
Next articleपुरातन शिव मंदिर धोत्रा नंदई येथे भक्तांची मांदियाळी….
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.