आशाताई बच्छाव
जाफराबाद येथे ग्राम उन्नती इंग्लिश स्कूल मध्ये स्वतंत्र दिन साजरा….. तालुका प्रतिनिधी जाफराबाद…. मुरलीधर डहाके….16/08/2024…. ग्राम उन्नती इंग्लिश स्कूल आदर्श नगर जाफ्राबाद येथे विद्यार्थी, प्रमुख पाहुणे व पालकाच्या उपस्थित 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिन आनंदी व उत्साही वातावरनात साजरा करण्यात आला.
आदर्श नगर परिसरातून प्रभात फेरी दरम्यान लेझीम ढोल क्रांतीवीर तसेच स्वातंत्र्यविराच्या घोषवाक्याच्या गजराने परिसरातील वातावरण प्रसन्न झाले. सैन्य दलात कर्तव्य बजावत असणारे मनोज शेजूळ साहेब व राहुल वाहुळे साहेब प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते प्रतिमा पूजन ध्वज पूजन करून ध्वजरोहन करून राष्ट्रगीत महाराष्ट्रगीत भारताचे संविधान उद्देशीकेचे वाचन करून राष्ट्र ध्वजालासलामी देऊन स्वातंत्र्य दिनाची रीतसर सुरुवात करण्यात आली वर्ग नर्सरी ते वर्ग 4थी पर्यंतच्या विध्यार्थ्यानी स्वातंत्र्य दिनाविषयीं गीत गायन भाषण केले तसेच शिक्षकांनी मनोगत व्यक्त केले कार्यक्रमच्या अध्यक्ष स्थानी शाळेच्या मुख्यध्यापिका रत्ना भिसे मॅडम होत्या कार्यक्रम यशस्वी रित्या पार पाडण्यासाठी शिक्षक सहशिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी गोफने सर, सांगळे मॅडम, पैठणे मॅडम, टोम्पे मॅडम पडोळ मॅडम शाळेच्या मदतनीस मिसाळ मावशी यांनी परिश्रम घेतले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गाडेकर सरांनी सांभाळले तर जाधव सरांनी सर्वांचे आभार मानून स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमांची सांगता केली आनंदी उत्साही प्रसन्न वातावरणात कार्यक्रम पार पडला.






