
आशाताई बच्छाव
घनसावंगीचा आमदार निष्क्रिय : सत्तेसाठी जनतेची दिशाभूल केली :
घनसावंगी विधानसभा लढणार अन् जिंकणारच – सतीश घाटगे
जालना,(दिलीप बोंडे ब्युरो चीफ): घनसावंगी मतदारसंघातील जनतेला खोटी आश्वासने देऊन २५ वर्षे आमदार राहिलेल्या राजेश टोपे यांनी जनतेची दिशाभूल केली.विकासाचे खोटे स्वप्न दाखवून जनतेला अविकसित ठेवण्याचे काम केले.त्यामुळे जनता आता परिवर्तन करणार असून घनसावंगी विधानसभेचा पुढचा आमदार हा महायुतीचाच होणार,असा विश्वास समृद्धी कारखान्याचे चेअरमन तथा भाजप नेते सतीश घाटगे यांनी व्यक्त केला.
शुक्रवारी (दि.५) रोजी जालना तालुक्यातील थेरगाव येथे भाजपच्या युवा व ज्येष्ठ कार्यकर्त्याच्या १५४ व्या शाखेच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते.थेरगावातील सांडपाण्याचा प्रश्न मिटवण्यासाठी सतीश घाटगे यांनी मंजूर करून आणलेल्या निधीतून भूमिगत गटार नालीच्या कामाचे उद्घाटन सतीश घाटगे यांनी केले.या कार्यक्रमास गावकऱ्यांची मोठी गर्दी झाली होती.सतीश घाटगे यांचे फटाके फोडून मोठ्या जल्लोषात युवकांनी स्वागत केले.
या कार्यक्रमास भाजपा युवा मोर्चाचे सरचिटणीस तथा शिवबा संघटनेचे प्रदेश कार्याध्यक्ष ज्ञानेश्वर देवडे,प्रभाकर धांडे,राजेंद्र छल्लारे,माधव टेहळे,गणेश गव्हाणे,दिपक भुतेकर,रोहिदास भुतेकर,योगेश काटे,पंडीत शिंदे,प्रल्हाद शेळके,राम आटोळे,परमेश्वर करपे,विकास भुतेकर,पुंजाराम खरजुले,शाळीकराम पवार,बळीराम भुतेकर, श्रीराम देशमुख यांच्यासह आदी पदाधिकारी उपस्थित होते.
४२ गावांचा विकासाचा अनुशेष भरून काढणार-
घनसावंगी मतदारसंघात येणाऱ्या जालना तालुक्यातील ४२ गावांचे मुलभूत प्रश्न देखील विद्यमान आमदार सोडवू शकले नाही.या गावांचा विकासाच्या बाबतीत विद्यमान आमदार निष्क्रिय ठरले आहेत.या गावांचा विकासाचा अनुशेष भरून काढण्यासाठी,शेतकरी व युवा वर्गाला रोजगार देणे गरजेचे आहे.