
आशाताई बच्छाव
पालकांनी आपली मते मुलांवर लादू नयेत तर त्यांना आवडणारे क्षेत्र निवडू
द्यावे : शिवसेना जिल्हाप्रमुख भास्करराव अंबेकर
केवळ पैशाला महत्व न देता समोरच्या व्यक्तीच्या चेहर्यावर आनंद दिसावा
यासाठी काम करा : डॉ. संजय राख
जालना, दि. ६(दिलीप बोंडे ब्युरो चीफ)– पालकांनी आपल्या इच्छा आकांक्षा मुलांवर लादू
नयेत तर त्यांना आवडणार्या क्षेत्रात करिअर आरण्याची संधी द्यावी.
पाल्यांवर विश्वास ठेवावा,असे आवाहन शिवसेना जिल्हाप्रमुख भास्करराव
अंबेकर यांनी केले.
जालना शहरातील शांतिनिकेतन विद्यामंदिर या शाळेत प्रियदर्शनी डॉ. संजय
राख यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून शहरातील नीट व जेईई या परीक्षेतील
अनेक गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव पुष्पगुच्छ व भेटवस्तू देऊन शिवसेना
जिल्हाप्रमुख भास्करराव अंबेकर यांनी सत्कार केला. यावेळी विद्यार्थी व
पालकांना मार्गदर्शन करतांना ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर संस्थेचे
संचालक तथा तालुकाप्रमुख हरिहर शिंदे, प्रा.राम कदम, शहरप्रमुख बाला
परदेशी, घनशाम खाकीवाले, दुर्गेश काठोटीवाले, विनोद वीर यांची उपस्थिती
होती.
यावेळी पुढे बोलतांना जिल्हाप्रमुख अंबेकर म्हणाले की, प्रियदर्शनी राख
ही एकटी अमेरिकेत वॉशिंग्टन येथे राहते,आई-वडिलांच्या संरक्षण कवचातून
बाहेर पडल्यावरच आपणांस जग कळते. मुलगी घरी उशिरा आल्यास अनेक प्रश्न
तिला विचारले जातात. मात्र मुले कितीही उशिरा घरी आल्यावर त्यांना तेवढी
विचारणा होत नाही. याप्रमाणे समाजात भेदभाव आढळतो, असे शिवसेना
जिल्हाप्रमुख भास्करराव अंबेकर म्हणाले. डॉ.राख यांची मुलगी प्रियदर्शनी
आई-वडिलांच्या संरक्षणातून बाहेर पडल्यामुळेच ती आत्मविश्वासाने वागू
लागली आणि तिने कुठेही तिच्यावरील विश्वासाला तडा कधीही जाऊ दिला नाही.
स्वप्न हा दोन अक्षरी शब्द आहे. परंतु आयुष्य त्याच्याभोवती फिरते.
आहे.