Home जालना शिक्षकांच्या विनंती बदलीचा प्रश्न आ.कैलास गोरंटयाल यांच्यामुळे लागला मार्गी

शिक्षकांच्या विनंती बदलीचा प्रश्न आ.कैलास गोरंटयाल यांच्यामुळे लागला मार्गी

23
0

आशाताई बच्छाव

1000525617.jpg

शिक्षकांच्या विनंती बदलीचा प्रश्न आ.कैलास गोरंटयाल यांच्यामुळे लागला मार्गी

शिक्षक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी सत्कार करत मानले आभार

जालना दि. ६ (दिलीप बोंडे ब्युरो चीफ) जालना जिल्हा परिषदे अंतर्गत जिल्ह्यात कार्यरत असलेल्या शिक्षकांच्या विनंती बदल्यांचा प्रश्न राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांच्या माध्यमातून मार्गी लावल्याबद्दल जालना विधानसभा मतदार संघाचे आमदार कैलास गोरंटयाल यांचे आभार व्यक्त करून विविध शिक्षक संघटनांच्या वतीने आज शनिवारी त्यांचा सत्कार करण्यात आला.
जालना जिल्हा परिषदे अंतर्गत जिल्ह्यातील दोन हजार शिक्षकांच्या विनंती बदलीचा प्रश्न मागील काही काळापासून प्रलंबित होता. विविध शिक्षक संघटनांच्या प्रतिनिधींनी अनेक वेळा मुख्य कार्यकारी अधिकारी व शिक्षणाधिकारी यांच्याकडे विनंती बदली प्रक्रिया सुरू करण्याची मागणी केली होती. ग्रामविकास विभागाचे अनेक आदेश असतांनाही शासन निर्णय स्पष्ट नसल्याचे कारण देऊन विनंती बदली प्रक्रिया राबवण्यास जिल्हा प्रशासनाने नकार दिला होता. त्यामुळे शिक्षक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी शेवटी  ग्रामविकास मंत्रालयात धाव घेतली. सध्या विधिमंडळाचे अधिवेशन सुरू असल्याने जालन्याचे आमदार कैलास गोरंट्याल यांनी ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांची भेट घेवून सभागृहात प्रश्नोत्तराचा तास सुरू असतांना ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांना बाहेर दालनात आणले व सर्व प्रतिनिधींशी चर्चा घडवून आणली. ग्रामविकास मंत्र्यांनी तत्काळ सचिवांशी चर्चा केली व या विषयात लक्ष घालण्याचे आदेशित केले. आमदार कैलास गोरंट्याल यांनी मंत्रालयातून मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती वर्षा मीना व शिक्षणाधिकारी कैलास दातखीळ यांच्याशी चर्चा करून शिक्षकांच्या विनंती बदल्या सुरू करण्याचे आदेश प्रशासनाला दिले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here