Home जालना अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीच्या महिला आघाडीच्या प्रदेश उपाध्यक्षपदी सौ अंजना...

अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीच्या महिला आघाडीच्या प्रदेश उपाध्यक्षपदी सौ अंजना राजुपत यांची निवड

158
0

आशाताई बच्छाव

1000525615.jpg

अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीच्या महिला आघाडीच्या प्रदेश उपाध्यक्षपदी सौ अंजना राजुपत यांची निवड
जिल्हा प्रतिनिधी जालना -वसंतराव देशमुख
दिनांक 06/07/2024
याविषयी सविस्तर माहिती अशी की, पिंपळगाव रेणुकाई ता.भोकरदन येथे अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीचा विभागीय मेळावा आयोजित करण्यात आला होता.या विभागीय महामेळाव्यात सर्वानुमते अंजना राजपूत यांची महिला आघाडीच्या प्रदेश उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली. अजिंठा येथील समाज सेविका तथा किसान करणी सेनेच्या प्रदेश अध्यक्ष महाराष्ट्र राज्य व अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीच्या जिल्हाध्यक्ष महिला आघाडी छत्रपती संभाजी नगर/ औरंगाबाद यांच्या कामाची दखल घेऊन त्यांची महाराष्ट्र राज्य महिला आघाडी प्रदेश उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली. त्यांनी जिल्ह्यातअनेक आंदोलन केले. उपोषणही केले अनेक सामाजिक विषयावर निवेदनही दिले आणि यातून गोरगरीब जनतेला न्याय मिळाला. ही निवड राष्ट्रीय अध्यक्ष प्रदीप बाबा पाटील खांडापुरकर यांच्या शुभ हस्ते करण्यात आली. ही निवड राष्ट्रीय कोर कमेटी आणि राष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर श्रीमती कविता जी रायजादा राष्ट्रीय अध्यक्ष महिला आघाडी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली ऍड. सौ. राणीताई स्वामी प्रदेशाध्यक्षा महिला आघाडी महाराष्ट्र राज्य यांनी या निवडी बदल सौ अंजना राजपुत यांना भ्रमणध्वनीच्या माध्यमातून शुभेच्छा दिल्या.नवनियुक्त राष्ट्रीय उपाध्यक्ष श्री वसंतराव देशमुख, राष्ट्रीय संघटक श्री अरुण देशमुख, प्रदेशाध्यक्ष श्री पंडितराव तिडके, विभागीय अध्यक्ष श्री शंकरराव देशमुख, विभागीय अध्यक्ष श्री गोकुळसिंग राजपूत, जालना जिल्हाध्यक्ष श्री कृष्णा लहाने, जालना जिल्हा सचिव श्री मुरलीधर डहाके, जाफराबाद तालुका अध्यक्ष श्री रामदास कदम, भोकरदन तालुका अध्यक्ष श्री बालासाहेब देशमुख, यांच्यासह राज्यातील सर्व जिल्हाध्यक्ष तालुकाध्यक्ष सर्व आघाड्यांचे पदाधिकारी उपस्तित होते. तसेच राष्ट्रीय पदाधिकारी व राज्य पदाधिकारी उपस्थित होते. या निवडी बद्दल अनेक क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here