Home नाशिक नामपूर येथे चोरीचे सत्र सुरूच…परिसर झालयं चोरट्यांना मोकळे रान…काकडगावला घरफोडीत लाखोंचा ऐवज...

नामपूर येथे चोरीचे सत्र सुरूच…परिसर झालयं चोरट्यांना मोकळे रान…काकडगावला घरफोडीत लाखोंचा ऐवज लंपास

159

आशाताई बच्छाव

1000526111.jpg

नामपूर येथे चोरीचे सत्र सुरूच…परिसर झालयं चोरट्यांना मोकळे रान…काकडगावला घरफोडीत लाखोंचा ऐवज लंपास

सतीश सावंत-विभागीय प्रतिनिधी : क. स. मा. दे.

नामपूर, ता. ६ : येथे गेल्या आठवड्यात झालेल्या धाडसी घरफोडीची घटना ताजी असताना काकडगाव (ता. बागलाण) येथील मालेगाव रस्त्यालगत श्रीराम वर्कशॉपसमोरील वंदना कोर यांच्या बंद दरवाजाचा कडीकोयंडा तोडून चोरट्यांनी प्रवेश करून सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह रोख रक्कम असा सुमारे सव्वा लाख रुपयांचा ऐवज लुटून लंपास केल्याची घटना शुक्रवारी (ता. ५) घडली. गेल्या काही महिन्यांपासून सातत्याने होणाऱ्या घरफोडींमुळे नागरिकांमध्ये भीतीचे सावट आहे. अनेक चोऱ्यांचा तपास लागत नसून दिवसेंदिवस खाकीचा धाक कमी झाल्याने पोलिसांच्या कामकाजाविषयी संशय व्यक्त होत आहे. काकडगाव येथील वंदना कोर खासगी कामानिमित्त बाहेरगावी गेल्या होत्या. याचा फायदा घेत अज्ञात चोरट्यांनी दरवाजाचा कडीकोयंडा तोडून घरात प्रवेश केला. कपाटात ठेवलेले एक तोळा सोन्याचे दागिने, पन्नास हजार रुपये रोख, असा सुमारे सव्वा लाखांचा ऐवज चोरुन नेला. नामपूर परिसरात गेल्या काही दिवसांपासून धाडसी चोऱ्या होत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. याप्रकरणी वंदना संजय कोर यांनी पोलिसात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी घटनेचा पंचनामा केला असून जायखेड्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक पुरुषोत्तम शिरसाठ यांच्या मार्गदर्शनाखाली नाना पाटील तपास करीत आहे.

.या चोऱ्यांचा तपास कधी लागणार ?

मागील आठवड्यात टेंभे वरचे (ता. बागलाण) येथील प्राथमिक शिक्षिका सुनंदा मगर यांच्या बंगल्यात भरदिवसा झालेल्या धाडसी घरफोडीत सुमारे तीन लाखांचा ऐवज चोरट्यांनी लुटून नेला. चोरीचा प्रकार वंदना कोर यांचे जेठ यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी दूरध्वनीद्वारे माहिती दिली. गेल्या काही महिन्यात सटाणा रस्त्यालगत धुळे पोलिस दलातील कर्मचारी भूषण पाटील, राजेंद्र कापडणीस यांच्या घरातील भाडेकरू रवींद्र वाणी, मृत प्राथमिक शिक्षक प्रशांत कापडणीस यांच्या घरी सुमारे दोन लाख रुपयांची धाडसी चोरी झाली होती. चोरीच्या गुह्यांचा तपास लागत नसल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. जायखेड़ा पोलिस ठाण्यात हद्दीत वारंवार होणाऱ्या चोऱ्यांच्या पार्श्वभूमीवर रात्रीची गस्त वाढवावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे शहरात कुणी अनोळखी व्यक्ती दिसल्यास पोलिसांशी संपर्क करावा, असे आवाहन पोलिस प्रशासनाने केले आहे.

Previous articleघनसावंगीचा आमदार  निष्क्रिय : सत्तेसाठी जनतेची दिशाभूल केली :
Next articleउमरी सहाय्यक पोलिस उपनिरिक्षक श्रीराम सवई यांचा सेवापुर्ती सोहळा .
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.