Home नांदेड उमरी सहाय्यक पोलिस उपनिरिक्षक श्रीराम सवई यांचा सेवापुर्ती सोहळा .

उमरी सहाय्यक पोलिस उपनिरिक्षक श्रीराम सवई यांचा सेवापुर्ती सोहळा .

79
0

आशाताई बच्छाव

1000526120.jpg

उमरी सहाय्यक पोलिस उपनिरिक्षक श्रीराम सवई यांचा सेवापुर्ती सोहळा .

मराठवाडा विभागीय संपादक मनोज बिरादार

नांदेड उमरी– पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक श्रीराम पांडूरंग सवई हे 3० जुन २०२४ रोजी सेवानिवृत झाल्याने त्यांना सेवापुर्ती सोहळा थाटात साजरा करून निरोप देण्यात आला आहे .
श्रीराम पांडूरंग सवई हे राहणार उमरी येथिल रहिवाशी असून त्यांचा जन्म दि २७ जुन १९६६ रोजी उमरी शहरातील आंबेडकर नगर येथे झाला . त्यांनी पोलिस दलात ४ नोव्हेंबर १९९२ मध्ये रुजू झाले . त्यांनी कुंडलवाडी पोलिस ठाणे , नांदेड ग्रामिन पोलिस ठाणे , वजीराबाद नांदेड पोलिस ठाणे , मुखेड पोलिस ठाणे आणि शेवट आपल्या मुळ गावी म्हणजे उमरी पोलिस ठाणे येथे त्याचां सेवापुर्ती सोहळा साजरा करण्यात आला. त्या कालावधी मध्ये एकंदरीत ३२ वर्ष उत्कृष्ट सेवा केली आहे त्यांनी त्या कालावधीत हुंडाबळी सारखे प्रकरण हाताळून पुन्हा कुंटुबाचे मने जुळन देवून सामाजिक न्याय दिला आहे . गंभीर गुन्ह्यांचा त्यांनी छडा लावला आहे मनाने प्रेमळ वेळप्रसंगी कठोर भुमिका घेवून वर्दीतला मानुस म्हणून मानुसकी दाखवून दिली आहे .त्यांच्या कार्याची दखल घेवून पोलिस खात्या अंतर्गतच सिनारीटी प्रमाणे सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक म्हणून पदोन्नती मिळाली. त्यांचा नियत सेवापुर्ती दि ३० जून २०२४ रोजी झाला आहे .
नांदेड पोलिस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी श्रीराम सवई व त्यांच्या सुविधा पत्नी शकुंतला सवई यांचा सहपत्नी सत्कार नांदेड पोलिस दला तर्फे करून सेवापूर्ती निरोप दिला. डी वाय एस पी प्रशांत संपते , पोलिस निरीक्षक अकुंश माने ही उमरी पोलिस ठाणेच्या वतीने सेवापुर्ती शुभेच्छा देवून त्यांच्या कार्याचा कर्तव्याचा गौरव करण्यात आला. त्या निमित सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक श्रीराम सवई यांचा सेवापुर्ती गौरव सोहळा उमरी समाजबांधवाच्या वतिने ४ जुलै २०२४ रोजी संत रविदास मंगल कार्यालय येथे ठेवण्यात आला होता यावेळी अनेकानी मनोगत व्यक्त करतांना भावनादिस झाले होते तर अनेकाचे डोळे पानावले. कुंडलवाडी , मुखेड , नांदेड येथिल तत्कालीन पोलिस मित्र , उंद्री ( प .दे ) जाहूर , पाळा , एकलारा , ता मुखेड येथिल प्रतिष्टीत नागरीक मोठ्या प्रमाणात उपस्थित दर्शवीली होती श्रीराम सवई हे पोलिस खात्यातून सेवानिवृत झाले तरी ते आम्हा पोलिस बांधवासाठी तितकेच प्रिय असणार असून त्यांनी शासकीय सेवा उत्कृष्टरित्या बजावले पण यापुढील आयुष्य हे सामाजिक बांधलकी म्हणून समाजसेवा करावी असे निरोप समारोपचे अध्यक्ष उमरी पोलिस निरीक्षक अंकुश माने यांनी प्रतिक्रिया दिली.
यावेळी उमरीयेथील पत्रकार , उमरी पोलिस, सामाजीक , राजकीय पक्षाचे मुख्य पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते .

Previous articleनामपूर येथे चोरीचे सत्र सुरूच…परिसर झालयं चोरट्यांना मोकळे रान…काकडगावला घरफोडीत लाखोंचा ऐवज लंपास
Next articleसोमपूरला वृक्षारोपण सोहळा संपन्न
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here