आशाताई बच्छाव
जाफराबाद तालुक्यात पावसाचे ‘कही खुशी’ ‘कही गम’. माहोरा जालना प्रतिनिधी-मुरलीधर डहाके दिनांक.22/06/2024
सविस्तर वृत्त असे की, जाफराबाद तालुक्यातील शेतकऱ्यांना पावसाने आठ दिवसांपासून उघडीप दिली आहे. त्यामूळे शेतकरी राजाचे डोळे आकाशाकडे लागले आहेत.मृग नक्षत्रात थोडा -फार पाऊस झाला त्या पावसावरच शेतकऱ्यांनी पेरणी सुरू केली.परंतु आणखी पाउस पडणार असल्याचे गृहीत धरून शेतकऱ्यांनी पेरणी पूर्ण केली.काही ठिकाणी उगवण चांगली झाली परंतु पावसाने उघडीप दिल्याने शेतकरी संकटात सापडला असतानांच काल दिनांक 21/06/2024रोजीकाही प्रमाणात पाऊस आला परंतु तो पाऊस सर्व परिसरात पडला नाही त्यामुळे शेतकरी वर्गामध्ये कही खुशी कही गम असे वातावरण निर्माण झाले आहे.सोयाबीन,मका , कपाशी, अशा अनेक पिकांची पेरणी करून झाली आहे. कसेबसे पीक जमिनीतून वर येत असताना पावसाने उघडीप दिल्याने शेतकरी चिंतातुर झाला आहे. काही भागात थोड्याफार प्रमाणात पाऊस पडल्यामुळे कही खुशी कही गम अशी अवस्था जाफराबाद तालुक्यातील शेतकऱ्यांची झाली आहे. तर काही ठिकाणी तुषार सिंचन द्वारे पाणी देण्यास शेतकऱ्यांना भाग पडले आहे. पावसाचा खेळ असाच सुरू राहिला तर शेतकऱ्यांना दुबारा पेरणीचे संकट येणार अशी भीती शेतकरी वर्गातून व्यक्त होताना दिसत आहे.