Home जालना जालना शहरातील योगेश नगर भागातील घरपोडी करणारा रेकॉर्डवरील आरोपी जेरबंद एकूण 86,500...

जालना शहरातील योगेश नगर भागातील घरपोडी करणारा रेकॉर्डवरील आरोपी जेरबंद एकूण 86,500 रुपयांचा मुद्देमाल जप्त स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

138

आशाताई बच्छाव

1000487474.jpg

जालना शहरातील योगेश नगर भागातील घरपोडी करणारा रेकॉर्डवरील आरोपी जेरबंद एकूण 86,500 रुपयांचा मुद्देमाल जप्त स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
जालना -वसंतराव देशमुख
दिनांक 23/06/2024
जालना शहरात दिनांक 8 /6 /2024 रोजी रात्री दोन वाजेच्या सुमारास अंबड चौफुली भागातील योगेश नगर येथे एका बंद घराचे लॉक तोडून अज्ञात आरोपीने कपाटातील सोन्या-चांदीचे व रोख रक्कम चोरी केली होती .त्या प्रकरणी पोलीस ठाणे तालुका जालना येथे गुरनं. 373/2024 कलम 457,380 भादवी प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदरचा गुन्हा उघडकीस आणणे बाबत मा. पोलीस अधीक्षक श्री अजय कुमार बंसल यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री रामेश्वर खनाळ यांना सूचना दिल्या होत्या. त्याअनुषंगाने पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा जालना यांनी पथकातील अधिकारी व अंमलदार यांना सदरचा गुन्हा उघडकीस आणणे बाबत सूचना देऊन मार्गदर्शन केले होते.
त्याअनुषंगाने दिनांक 21/0 6 /2024 रोजी स्थानिक गुन्हे शाखेतील पोलीस अधिकारी व अंमलदार हे नमूद गुन्ह्यातील अज्ञात गुन्हेगारांचा शोध घेत असताना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, सदरचा गुन्हा हा रेकॉर्डवरील हद्दपार दीपक सिंग प्रल्हादसिंग टाक याने त्याचे दोन भावासह केल्याची खात्रीलायक माहिती मिळाली. त्यानुसार त्यांचा शोध घेत असताना त्यांचे पैकी हद्दपार दीपक सिंग टाक वय 28 वर्षे राहणार गुरुगोविंद सिंग नगर जालना हा चौधरी नगर भागात मोटरसायकलवर फिरताना मिळून आल्याने त्याला शिताफीने ताब्यात घेऊन गुन्ह्याबाबत विचारपूस केली असता सदरचा गुन्हा केल्याची कबुली देऊन सदर गुन्हा मी व माझे भाऊ गोपीसिंग प्रल्हादसिंग टाक व शक्तीसिंग प्रल्हादसिंग टाक यांनी मिळून गुन्हा केला आहे. व गुन्ह्यातील चोरी केलेले सोने-चांदीचे दागिने व रक्कम आम्ही आपसात वाटून घेतले आहे असे सांगितले.हद्दपार गुन्हेगार दीपक सिंग प्रल्हादसिंग टाक वय 28 वर्षे राहणार गुरुगोविंद सिंग नगर जालना याचे ताब्यातून चोरी गेलेल्या मुद्देमालासह एकूण रुपये 86500 किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. त्याचे नमूद साथीदारांचा जालना शहरात शोध घेतला असता ते मिळून आले नाही. आरोपीस पोलीस ठाणे तालुका जालना येथे रिपोर्ट सह हजर करण्यात आले आहे पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक दिगंबर पवार हे करीत आहे.
तसेच हद्दपार आरोपी दीपकसिंग प्रल्हादसिंग टाक 28 वर्ष राहणार गुरुगोविंद सिंग नगर जालना यास महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 55 अन्वये जालना जिल्ह्यातून सहा महिने कालावधी करिता हद्दपार केलेले असताना देखील तो चौधरी नगर जालना येथे हद्दपार केलेल्या कालावधीमध्ये कोणतीही परवानगी न घेता मिळून आल्याने त्याने मा. पोलीस अधीक्षक जालना यांनी पारित केलेल्या आदेशाचे उल्लंघन केलेले आहे. म्हणून हद्दपार गुन्हेगार दीपकसिंग प्रल्हादसिंग टाक वय 28 वर्षे राहणार गुरुगोविंद सिंग नगर जालना याचे विरुद्ध महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 142 प्रमाणे पोलीस ठाणे तालुका जालना येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदरची कारवाई मा. पोलीस अधीक्षक श्री अजय कुमार बंसल व मा. अप्पर पोलीस अधीक्षक श्री आयुष नोपाणी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री रामेश्वर खानावळ, पोलीस अमलदार सॅम्युअल कांबळे, कृष्णा तंगे ,सचिन चौधरी, प्रशांत लोखंडे, योगेश सहाने, कैलास चेके, चालक सौरभ मुळे सर्व स्था.गु.शा.जालना यांनी केली आहे.

Previous articleइतिहासात पहिल्यांदाच विधान परिषदेच्या मैदानात थेट मुख्यमंत्र्यांची एन्ट्री
Next articleजाफराबाद तालुक्यात पावसाचे ‘कही खुशी’ ‘कही गम’
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.