Home बुलढाणा मरण देता का मला मरण..’ -किनगाव राजा येथील पिडीतांचा टाहो !

मरण देता का मला मरण..’ -किनगाव राजा येथील पिडीतांचा टाहो !

47
0

आशाताई बच्छाव

1000487241.jpg

मरण देता का मला मरण..’ -किनगाव राजा येथील पिडीतांचा टाहो !
युवा मराठा न्यूज संजय पन्हाळकर बुलढाणा जिल्हा ब्युरो चीफ
बुलढाणा :- किनगांव राजा मध्ये दहशत एवढी वाढली की लोक इच्छा मरणाची परवानगी मागित आहे. विशेष म्हणजे अल्पसंख्यांक कुटुंबांना मिळत आहे. मौजे किनगांव राजा ता. सिंदखेड राजा जि. बुलडाणा येथील सौ. पुष्पा प्रकाश जैन
(सोनी) यांनी आज मा. जिल्हाधिकारी साहेब, बुलडाणा यांना इच्छा मरणाची परवानगी मागितली. या बाबत थोडक्यात हकीकत अशी की, सौ. पुष्पा प्रकाश जैन (सोनी) यांची गट नं.580 मध्ये 1.25 आर जमिन असून त्याला तारेचे कुंपण केलेले होते. अशी परिस्थितीअसतांना शेजारी शिवाजी भिकाजी काळुसे व परिवार यांनी आमची जमिन कमी भरते म्हणून सौ. पुष्पा प्रकाश जैन (सोनी) यांनी केलेले तारेचे कुंपन दादागीरीने काढून फेकून
दिले व सदर जमिनीतील 20 गुंठे जमिन माझी आहे तुम्ही पेरायची नाही अशी धमकी दिली. या गैरप्रकाराबाबत सौ. पुष्पा प्रकाश जैन (सोनी) यांनी रितसर पोलीस स्टेशन किनगांव राजा येथे तक्रार केली पण पोलीसाद्वारे हे सिव्हील मॅटर आहे म्हणून कारवाईस टाळाटाळ होत आहे व गुन्हेगारास पाठीशी घालत असे दिसते. सदर गैरअर्जदार बहुजन समाजाचे आहे त्यांच्याकडे 20 ते 25 माणसाचा जोडजमाव आहे. याचा गैरफायदा घेत विधायक मार्गाने सरकारी मोजणी न आणता शेजारी अल्पसंख्यांक स्त्री सौ. पुष्पा प्रकाश जैन (सोनी) यांच्या जमिनीवर दादागीरीने ताबा करण्याच्या प्रयत्नात आहे. या गुंडा गर्दीने सदर अल्पसंख्यांक कुटूंब प्रचंड दहशतीखाली आहे जर मला या सुस्कृत लोकशाही प्रधान महाराष्ट्रात न्याय मिळत
नसेल व गुंडा गर्दी हवी होत असेल तर मला असल्या लाचार जिवन जगण्यात स्वारस्थ नाही. त्यामुळे त्यांनी मा. जिल्हाधिकारी साहेबांकडे इच्छा मरणाची परवानगी मागितली आहे.

Previous articleसोनई परीसरात योगदिन
Next articleसहा वर्षीय चिमुकलीवर अत्याचार, संतप्त जमावाकडून पोलिसांवर दगडफेक
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here