Home उतर महाराष्ट्र सोनई परीसरात योगदिन

सोनई परीसरात योगदिन

135

आशाताई बच्छाव

1000487229.jpg

सोनई परीसरात योगदिन

सोनई,(कारभारी गव्हाणे तालुका प्रतिनिधी) सोनंई व परीसरात जागतिक योगदिन उत्साहात संपन्न झाला. शाळा, महाविद्यालय, सामाजिक संस्था, शासकीय व सहकारी संस्थेच्या वतीने योग, प्राणायाम शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. संत निरंकारी भवनमध्ये विठ्ठल महाराज खाडे यांच्या मार्गदर्शनाखाली योग शिक्षिका आकांक्षा यांच्या अध्यक्षतेखाली योगदिन साजरा झाला. प्रजापिता ब्रम्हाकुमारी विश्व विद्यालयात उषादिदी यांनी मन आणि शरीर यांची एकाच वेळी तयारी झाली की रोज

योग, प्राणायाम घडून येतो. यात सातत्य असेल तर ती व्यायामाची साधना होऊन जीवनात राजयोग घडतो, असे सांगितले. कृषी महाविद्यालय सोनई, राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेविकांनी शिरेगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत योग दिन साजरा केला. मुळा एज्युकेशन संस्थेचे डॉ. आंबेडकर विद्यालय, पब्लिक स्कूल, शनिश्वर विद्यालय, यश अकॅडेमी, सोनई महाविद्यालय व आदर्श विद्यामंदिर, परिसरातील जिल्हा परिषदेच्या सर्व शाळांत योग कार्यक्रम संपन्न झाला.

Previous articleवैद्यकीय प्रवेश परीक्षा रद्द करून नव्याने परीक्षा घ्यावी – आ. कानडे
Next articleमरण देता का मला मरण..’ -किनगाव राजा येथील पिडीतांचा टाहो !
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.