आशाताई बच्छाव
सहा वर्षीय चिमुकलीवर अत्याचार, संतप्त जमावाकडून पोलिसांवर दगडफेक
प्रतिनिधी-सतीश सावंत
जळगाव जिल्ह्यातील मंत्री गिरीश महाजन यांचा मतदारसंघ असलेल्या जामनेर तालुक्यात हादरवणारी घटना घडली असून, संतप्त जमावाने पोलीस स्टेशनवर दगडफेक केल्याने 15 पोलीस जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेत समोर आलेल्या माहितीनुसार 11 जून रोजी जामनेर तालुक्यात एका 6 वर्षीय मुलीवर अत्याचार करून नंतर तिची हत्या केल्याची संतापजनक घटना उघडकीस आली होती. या पस्तीस वर्षीय आरोपीने चिमुरडीवर अत्याचार करून तिची हत्या केली आणि तिचा मृतदेह गावाजवळील एका केळीच्या शेतात टाकून दिला. ही घटना घडल्यानंतर तब्बल दहा दिवस हा आरोपी फरार झाला होता, तर जामनेर पोलीस स्टेशनमध्ये मुलगी बेपत्ता असल्याची तक्रार दाखल करण्यात आली होती बेपत्ता मुलीचा शोध घेतला असता तिचा मृतदेह गावाजवळील एका केळीच्या शेतात आढळून आला चौकशी दरम्यान चिमुकलीवर अत्याचार करून तिची हत्या केल्याचे स्पष्ट झाले.
दहा दिवसानंतर या फरार आरोपीला पोलिसांनी अटक केली मात्र यानंतर गावातील संतप्त जमावाने आरोपीला जमावाच्या ताब्यात देण्याची मागणी केली आणि नराधम आरोपीला शिक्षा आम्हीच देणार असल्याचे म्हटले. पोलिसांनी जमावाला शांत करण्याचा प्रयत्न केला मात्र ते ऐकायला तयार नव्हते. यावेळी संतप्त जमावाने जामनेर पोलीस स्टेशन वरच दगडफेक केली आणि या दगडफेकीत 15 पोलीस गंभीर जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे.
काय म्हणाले एकनाथ खडसे?
दरम्यान या प्रकरणी एकनाथ खडसे म्हणाले की आरोपीला राजकीय संरक्षण असल्याच्या भावनेतून ही दगडफेक झाली असावी मात्र अशा प्रकारे दगडफेक करणे हे चुकीचच आहे असेही ते यावेळी म्हणाले.
गिरीश महाजन यांचे आवाहन
तर मतदारसंघाचे आमदार आणि मंत्री गिरीश महाजन यांनी याबाबत ट्विटही केल असून “काल रात्री जामनेर मध्ये दिसून आलेला जनतेचा आक्रोश व संताप हा रास्त आहे. कोणत्याही नागरिकांचा संताप अना वर व्हावा असेच कुकृत्य हे या घटनेत संबंधित नराधामाने केले आहे या दुर्दैवी घटनेमुळे मी देखील आपल्या इतकाच संतप्त व व्यथित असून माझी आपणा सर्वांना विनंती आहे की कृपया आपल्या भावनांना आवर घाला.
कोणीही कायदा हातात घेऊ नका तपास यंत्रणेला पोलिसांना त्यांचे काम करू द्या. दोषी व्यक्तीला कठोर शिक्षा व्हावी यासाठी काटेकोर तपास करण्याचे आदेश दिलेले आहेत तसेच संपूर्ण परिस्थितीवर मी स्वतः लक्ष ठेवून आहे आणि संकटग्रस्त कुटुंबाला आवश्यक ती सर्व मदत तातडीने पुरविण्याच्या सूचनाही मी संबंधित प्रशासनाला दिलेल्या आहेत असे ते यावेळी म्हणाले.






