आशाताई बच्छाव
सटाणा येथील मातोश्री शाळेत योग दिन उत्साहात साजरा
सटाणा प्रतिनिधी-सतीश सावंत
दिनांक :- 21/06/2024
सटाणा ता. बागलाण येथील मातोश्री आय.एस.पाटील पब्लिक स्कूल शाळेत आज शुक्रवार ता. 21 रोजी आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यात आला. यावेळी योगविषयीचे महत्त्व विशद करण्यात आले. संयुक्त राष्ट्र संघाने सन 2015 पासून जगभरात हा दिवस योग दिन म्हणून साजरा करण्याचे ठरविले.
योगसाधनेचे मूळ उगमस्थान भारत देश आहे आणि ग्रामीण भागापासून ते शहरापर्यंत योगाचे महत्व पटवून देणे ही काळाची गरज आहे आणि म्हणूनच 21 जून हा उत्तर गोलार्धातील वर्षातील सर्वात मोठा दिवस असतो. तर दक्षिण गोलार्धातील हा दिवस सर्वात लहान असतो. त्यामुळे जगभरातील अनेक भागामध्ये या दिवसाचे विशेष महत्त्व आहे. परंतु याच दिवशी सूर्याचे दक्षिणायन सुरू होते आणि याच दिवशी सर्वात पहिला योगी म्हणून गणला जाणाऱ्या शंकराने योगविषयीचे ज्ञान जगासमोर आणले. म्हणून 21 जून हा आंतरराष्ट्रीय स्तरावर योग्य दिन म्हणून साजरा करण्यात येतो. यावेळी सर्व मुलांचे शारीरिक व्यायाम व उत्तेजक हालचाली आणि योगासने सर्व शिक्षक आणि विद्यार्थी यांनी केली. यामध्ये शाळेच्या मुख्याध्यापिक श्रीम. छाया पाटील मॅडम, उपशिक्षक सतीश सावंत, दिपक बोरसे, भाऊसाहेब खैरनार, वैभव अहिरे, जितेश अहिरे, जितेश पवार, सागर देवरे, प्रियंका सोनवणे आणि जयश्री खैरनार या सर्वांनी विद्यार्थ्यांसमवेत प्रत्यक्षरित्या सहभाग घेतला.