Home जळगाव वाघळी येथील ज्वेलर्स दुकानातुन 27 हजाराच्या चांदीच्या अंगठ्या लंपास

वाघळी येथील ज्वेलर्स दुकानातुन 27 हजाराच्या चांदीच्या अंगठ्या लंपास

118

आशाताई बच्छाव

1001150429.jpg

वाघळी येथील ज्वेलर्स दुकानातुन 27 हजाराच्या चांदीच्या अंगठ्या लंपास

चाळीसगाव प्रतिनिधी विजय पाटील- तालुक्यातील वाघली येथील ज्वेलर्स सोन्या-चांदीचे दुकानाचे शटरचे लॉक तोडून दुकानातील ड्रावरमध्ये ठेवलेल्या 27 हजार रुपये किमतीच्या 376 ग्रॅम वजनाच्या चांदीच्या 210 अंगठ्या अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना दि 9/1/2025 रोजी रात्री ते दि 10/01/2025 रोजी सकाळी 10 वाजेच्या दरम्यान घडली असून चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्टेशन ला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत माहिती अशी की कुणाल प्रेमराज सोनार, 24 रा. वाघळी ता. चाळीसगाव यांचे मालकीचे वाघली येथे कुणाल ज्वेलर्स नावाचे सोन्या-चांदीचे दुकान असुन सदर दुकानावर ते व त्यांचे वडिल प्रेमराज सोनार दोन्ही थांबतात
नेहमीप्रमाणे त्यांनी दि 9/1/25 रोजी रात्री 8 वाजता दुकान बंद केले व दि 10/1/25 रोजी सकाळी 10 वाजता कुणाल सोनार हे दुकान उघडण्यासाठी गेले असता त्यांना दुकाना जवळील नालीत दुकानाला बाहेरुन लावलेले दोन सी.सी.टी.व्ही. कॅमेरे तुटुन पडलेले दिसले
व दुकानाला लावलेले एक बाजुचे शटर लॉक तुटलेला दिसला त्यांनी लागलीच वडिलांना व पोलीस पाटील यांना फोन करुन सांगितले. पोलीस पाटील पाटील यांनी चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्टेशनला कळवून पोलीसांसोबत आमचे कुणाल ज्वेलर्स या दुकानात जावुन पाहिले असता दुकानातील ड्रावरमध्ये ठेवलेले तीन काचेच्या बॉक्समध्ये असलेल्या 376 ग्रॅम वजनाच्या 210 चांदीच्या अंगठ्या चोरी गेल्याचे दिसून आले
याप्रकरणी चाळीसगाव ग्रामीण पोलिस स्टेशन ला अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास हवालदार विजय शिंदे करीत आहेत.

Previous articleअनेक लोकांना चावा घेऊन जखमी केलेल्या कन्नड घाटातील पिसाळलेल्या माकडाला अखेर केले जेरबंद
Next articleरस्त्यावर खाजगी ट्रॅव्हल्स उभ्या केल्यास दंडात्मक कारवाई चाळीसगावात पोलीसांचा इशारा
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.