आशाताई बच्छाव
रस्त्यावर खाजगी ट्रॅव्हल्स उभ्या केल्यास दंडात्मक कारवाई
चाळीसगावात पोलीसांचा इशारा
चाळीसगाव प्रतिनिधी विजय पाटील- शहरात रस्त्यांवर खाजगी ट्रॅव्हल्स उभ्या करून अडथळा निर्माण करण्याचा प्रयत्न झाला तर अशा वाहनांवर दंडात्मक कारवाई करण्यात येईल असा इशारा शहर वाहतुक शाखेच्या सहाय्यक निरीक्षकांनी दिला.
चाळीसगाव शहरात बसस्टँड व भडगांव रोड काही खाजगी ट्रॅव्हल्स व उभ्या राहत असल्याने नागरीकांमध्ये मोठ्या प्रमाणावर ओरड होती. या पाश्वभूमीवीर या परिसरातील ट्र्राफीक जाम होण्याचे समस्येवर उपाययोजना करणेकरीता ट्रॅव्हल्स बुकींग एजंटांची चाळीसगाव शहर वाहतुक शाखेच्या कार्यालयात आज रोजी सहाय्यक निरीक्षक प्रदीप एकशिंगे यांनी बैठक घेतली. यावेळी दररोज रात्री 7.30 ते 9 वाजेच्या दरम्यान खाजगी ट्रॅव्हल्सचालक आपल्या बसेस प्रवासी घेण्याकरीता रस्त्यावरच उभ्या करतात. त्यामुळे रस्त्यावर वाहतुक जाम होवुन नागरिकांना तसेच व्यापार्यांना त्रास होतो.
हा त्रास होवु नये म्हणुन ट्रॅव्हल्स बसेस रस्त्यावर उभ्या करु नये. ट्रॅव्हल्स बसेसमुळे वाहतुकीस अडथळा निर्माण झाला तर दंडात्मक कारवाई करण्यात येईल असा इशारा सहाय्यक निरीक्षकांनी यावेळी दिला. सर्व ट्रॅव्हल्स चालक व मालक यांनी मोटार वाहन कायद्यातील सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याबाबत सुचना देखील त्यांनी यावेळी दिल्या.






