आशाताई बच्छाव
महाराष्ट्र पोलीस भरती साठीची मैदानी चाचणी परीक्षा १९ जुन पासून
जिल्हा प्रतिनिधी जालना-वसंतराव देशमुख
दिनांक १७/०६/२०२४
याविषयी सविस्तर वृत्त असे की, महाराष्ट्र राज्य पोलीस दलातील रिक्त पदे भरण्यासाठीची मैदानी चाचणी परीक्षा दिनांक १९/०६०२०२४ पासून सुरू होणार आहे.उमेदवारांना विविध पदाकरिता( पोलीस शिपाई, चालक, बँड्समन, सशस्त्र पोलीस शिपाई, तुरंग विभाग शिपाई) एका घटकात किंवा वेगवेगळ्या घटकात अर्ज करता येतात. त्यानुसार काही उमेदवारांना एकाच दिवशी अथवा लागोपाठचे दिवशी दोन पदाकरिता मैदानी चाचणीसाठी हजर राहणे बाबतची स्थिती निर्माण होऊ शकते व त्यामुळे काही उमेदवारांची गैरसोय होऊ शकते. म्हणून सर्व घटक प्रमुखांना व mahait विभागात सूचना देण्यात आली आहे की, ज्या उमेदवारास एकाच वेळी दोन पदाकरिता मैदानी चाचणीस हजर राहण्यासाठी सूचना दिली असेल असा उमेदवार पहिल्या ठिकाणी हजर राहिल्यानंतर त्या उमेदवारांना दुसऱ्या ठिकाणी हजर राहण्यासाठी वेगळी तारीख देण्यात यावी. दुसऱ्या ठिकाणचे घटक प्रमुखांनी अशा उमेदवारांची मैदानी चाचणी घ्यावी. तसेच मैदानी चाचणीची पहिली तारीख आणि दुसरी तारीख यामध्ये किमान ४ दिवसाचे अंतर असावे. मात्र याकरिता उमेदवार पहिल्या मैदानी चाचणीस हजर होता याचे लेखी पुरावे दुसऱ्या मैदानी चाचणी वेळी सादर करावे लागतील. “पोलीस भरती 2022- 23 मध्ये ज्या उमेदवारांनी एकापेक्षा जास्त पदाकरिता अर्ज केले आहेत आणि त्यांची मैदानी चाचणी एकाच दिवशी आली असेल अशा उमेदवारांना किमान ४ दिवस अंतराने वेगवेगळ्या तारखा दिल्या जातील. उमेदवारांना अडचण/ शंका असल्यास त्यांनी runak.saraf@mahait.org यावर ईमेल करावा “असे पोलीस विभागाने कळविले आहे.






