आशाताई बच्छाव
एसटीच्या विद्यार्थी पास सवलत योजनेत मोठा बदल.
आता एस टी पास मिळणार शाळेतच
जिल्हा प्रतिनिधी जालना-वसंतराव देशमुख
17/06/2024
याविषयी सविस्तर वृत्त असे की,एस टी महामंडळाच्या बसमधून प्रवास करणाऱ्या महाराष्ट्रातील शालेय विद्यार्थ्यांसाठी महत्वाची व आनंदाची बातमी आहे.एसटी महामंडळाच्या वतीने विद्यार्थ्यांसाठी प्रवास भाड्यात 66%सवलत दिली जाते.या पाससाठी विद्यार्थ्यांना केवळ 33% पैसे भरून पास काढता येत असतो.तर विद्यार्थ्यांनींना इयत्ता बारावी पर्यंत मोफत एसटी पास मिळत असतो.आता एसटीने प्रवास करणाऱ्या शालेय विद्यार्थ्यांना थेट शाळेतच एसटी पास वितरीत करण्याचा निर्णय घेतला आहे.राज्यात सध्या एसटी महामंडळाच्या 16 हजार बसेस आहेत यासाठी 87 हजार कर्मचारी सेवा देत आहेत.एसटी महामंडळ अनेक समाज घटकांना सवलतीच्या दरात प्रवास करण्याची संधी उपलब्ध करून देत आहे.या सवलतीची प्रतिपूर्ती रक्कम शासन एसटी महामंडळाला परत करित असते.
शाळा, महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या लाखो विद्यार्थी व विद्यार्थिनींना आता प्रवास करण्यासाठीच्या पासचे वितरण थेट त्यांच्या शाळेतच करण्यात येणार आहेत.तशा सुचना एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ माधव कुसेकर यांनी स्थानिक एसटी प्रशासनाला दिल्या आहेत.नविन वर्षाच्या पहिल्या सत्रातील शाळा सुरू झाल्या आहेत.घरापासुन शाळेपर्यंत जाण्यासाठी शासनाने विद्यार्थ्यांना एसटीच्या माध्यमातून 66% इतकी सवलत दिली आहे.म्हणजे केवळ 33% रक्कम भरून विद्यार्थ्यांना मासिक पास काढता येतो.त्याचप्रमाणे शासनाच्या पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर योजनेअंतर्गत बारावी पर्यंत शिक्षण घेणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांनींना मोफत एसटी पासचे वितरण केले जाते.यासाठी विद्यार्थी व विद्यार्थिनींना एसटी पास केंद्रावर जाऊन रांगेत उभे राहुन पास घेण्याची गरज नाही.यावर्षीपासुन विद्यार्थ्यांना पास साठी आता रांगेत ताटकळत उभे राहावे लागणार नाही.आता एसटी महामंडळ त्यांच्या शाळा महाविद्यालयांनी दिलेल्या यादीनुसार संबंधित विद्यार्थ्यांना आणि विद्यार्थ्यांनींना त्यांचे एसटी पास थेट शाळेतच देणार आहे.जेणेकरुन विद्यार्थ्यांचा वेळ वाया जाणार नाही.या संदर्भात 18 जुन पासून एसटी महामंडळ प्रशासनातर्फे ‘एसटी पास थेट तुमच्या शाळेतच ‘हि विशेष मोहीम राबविण्यात येत आहे.ततपुर्वि सर्व शाळा महाविद्यालयाच्या मुख्याध्यापक व प्राचार्य यांना एसटीच्या आगार व्यवस्थापकांनी शाळेत नविन वर्षात विद्यार्थी व विद्यार्थिनींच्या याद्या तयार ठेवण्यास सांगितले आहे.या अभिनव योजनेचा लाभ राज्यातील शिक्षण घेत असलेल्या लाखो विद्यार्थी व विद्यार्थिनींना होणार असल्याचे एसटी महामंडळ प्रशासनातर्फे सांगण्यात आले आहे.






