Home भंडारा विविध आंबेडकरी गटांना एकत्र आणण्याकरिता भंडारा येथे चर्चासत्र संपन्न.

विविध आंबेडकरी गटांना एकत्र आणण्याकरिता भंडारा येथे चर्चासत्र संपन्न.

50
0

आशाताई बच्छाव

1000467153.jpg

विविध आंबेडकरी गटांना एकत्र आणण्याकरिता भंडारा येथे चर्चासत्र संपन्न.

 

 

संजीव भांबोरे
भंडारा (जिल्हा प्रतिनिधी)दिनांक 15/ 6 /2024 रोजी शासकीय विश्रामगृह भंडारा येथे ज्येष्ठ आंबेडकरी नेते अमृतजी बनसोड यांचे अध्यक्षतेखाली विविध आंबेडकरी गटांच्या पूढार्‍यांना एका माणसावर आणून सर्व गटांचे एकत्रीकरण करण्यासंबंधी विचार विमर्स करण्याकरिता चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले.
सर्व आंबेडकरी गटांच्या पुढाऱ्यांनी आपापले विचार व्यक्त करून, राज्यातील सर्व आंबेडकरी गटांच्या पुढार्‍यांना एका मंचावर आमंत्रित करून एकीकृत रिपब्लिकन पार्टी तयार करण्यासाठी सर्वांनी पुढाकार घ्यायचे असे एकमताने ठरविण्यात आले.
एकत्रीकरणाच्या सभेचे आयोजन माजी सभापती चंद्रशेखर टेंभुर्णे यांनी केले. सभेला रोशन जांभुळकर, प्रेम सागर गणवीर, प्राध्यापक रमेश जांगडे, परमानंद मेश्राम, आशिष बागडे, प्राध्यापक राहुल मानकर, महेंद्र गडकरी, मनोज बागडे, इंजिनीयर रूपचंद रामटेके, ज्ञानचंद जांभुळकर, सूर्यभान हुमणे, दिलीप वानखेडे, तुळशीदास गेडाम, मदनलाल गोस्वामी, नेपाली जी, शशिकांत भोयेर, कैलास गेडाम, विलास मेश्राम, अरुण गोंडणे, संजीव भांबोरे, डी जी रंगारी, राजकुमार बनसोड, विजय भोवते, श्रीराम बोरकर, राजपाल नाईक, नरेंद्र भोयर, दीपक जनबंधू, नरेंद्र बनसोड, मनोज खोब्रागडे, दादू जी बडोले, धनपाल गडपायले, संजय गजभिये, भीमराव खोब्रागडे, अजित कुमार गजभिये, सचिन शहारे, कालिदास खोब्रागडे, ओमप्रकाश कोचे, अरविंद काणेकर, शिवदास गजभिये, नित्यानंद मेश्राम, शैलेश जांभुळकर, मनसाराम दहिवले, डॉक्टर परमानंद बागडे, अचल मेश्राम, अविनाश श्याम कुवर, अनमोल देशपांडे, तनुजा नागदेवे, व बहुसंख्य विविध गटातील आंबेडकरी चळवळीचे पुढारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सभेचे संचालन प्राध्यापक रमेश जांगडे यांनी केले तर आभार रोशन जांभुळकर यांनी मानले.

Previous articleदापोडी येथे दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ संपन्न
Next articleजि प.प्राथमिक शाळा वनसगाव ता.निफाड शाळेत प्रवेशोत्सव कार्यक्रम साजरा
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here