Home भंडारा १ पासून कुस्ती प्रशिक्षण शिबिराचे आयोजन

१ पासून कुस्ती प्रशिक्षण शिबिराचे आयोजन

134

आशाताई बच्छाव

1000417360.jpg

१ पासून कुस्ती प्रशिक्षण शिबिराचे आयोजन

संजीव भांबोरे
भंडारा (जिल्हा प्रतिनिधी) :– जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यलय भंडारा व जाणता राजा कुस्ती प्रशिक्षण केंद्र भंडारा यांच्या संयुक्त विद्यमाने कुस्ती प्रशिक्षण शिबिराचे आयोजन दिनांक १ जुन ते ३० जुन २०२४ पर्यंत या कालावधीत छत्रपती शिवाजी महाराज, जिल्हा क्रीडा संकुल कुस्ती प्रशिक्षण केंद्र येथे करण्यात आले आहे.
सदर प्रशिक्षण शिबिरात ५ ते ३० वर्षाच्या मुला – मुली तसेच प्रौढ वयोगटासाठी राहणार असून प्रशिक्षक म्हणून राष्ट्रीय पंच, उस्ताद व राज्यस्तरीय खेळाडू यांच्या मार्गदर्शनाखाली खेळाडूंना शिबिरात प्रशिक्षण देण्यात येणार आहे.
कुस्ती प्रशिक्षणाची वेळ सकाळी ६ ते ८ व सायंकाळी ५ ते ७ वाजेपर्यंत राहणार आहे.
तरी जिल्ह्यातील नव-नविन व जास्तीत जास्त खेळाडूंनी कुस्ती प्रशिक्षण शिबिराचा लाभ घेण्यासाठी प्रशिक्षक अशोक बन्सोड- ९८६०७६२०२२, विलास केजरकर- ८६६८४१२०९०, शुभम बागडे- ७०२०९७१२१९ यांच्याशी संपर्क साधून नावांची नोंद करावी असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी लतिका लेकुरवाळे यांनी केले आहे.

Previous articleविद्यार्थ्यांनी जिद्द चिकाटी व आत्मविश्वासाने सदैव कार्यमग्न राहावे- उपविभागीय पोलिस अधिकारी रष्मिता राव
Next articleश्रीरामपूर येथील डी पॉल पब्लिक स्कुल (सी बी एस ई) चा 100% निकाल.
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.