Home जालना ना वैद्यकीय पदवी,ना वैद्यकीय ज्ञान तरीही मुन्नाभाईं डाॅक्टरांचा व्यवसाय जोमात.

ना वैद्यकीय पदवी,ना वैद्यकीय ज्ञान तरीही मुन्नाभाईं डाॅक्टरांचा व्यवसाय जोमात.

153
0

आशाताई बच्छाव

1000414908.jpg

ना वैद्यकीय पदवी,ना वैद्यकीय ज्ञान तरीही मुन्नाभाईं डाॅक्टरांचा व्यवसाय जोमात.
जालना जिल्ह्यात
कायद्याची सर्रास पायमल्ली कोणताही अनुभव व शिक्षण नसतांनाही
हायडोस देऊन रुग्णांच्या जिवाशी खेळला जातो खेळ 
जिल्हा प्रतिनिधी जालना -वसंतराव देशमुख
दिनांक 29/05/2024
याविषयी सविस्तर माहिती अशी की,डॉक्टर बनण्यासाठी ‘नीट’ची परीक्षा उत्तीर्ण करून वैद्यकीय पदवी मिळवावी लागते. मात्र, एखाद्या डॉक्टरच्या हाताखाली काम केल्यानंतर आपण फार मोठे तज्ज्ञ डॉक्टर झाल्याचा आव आणत कोणतीच वैद्यकीय पदवी प्राप्त न करता रुग्णांवर उपचार करणाऱ्या बोगस डॉक्टरांचे जालना जिल्ह्यात पेव फुटले असून ना वैद्यकीय पदवी, ना पुरेसे वैद्यकीय ज्ञान नसताना ग्रामीण भागात मुन्नाभाई दवाखाना थाटून रुग्णांच्या जिवाशी खेळत असल्याचे अनेक उदाहरणे पहावयास मिळत आहेत. ग्रामीण भागातील निरक्षर व आर्थिक अडचणीत असलेल्या नारिकांची नेमकी मानसिकता या डॉ.मुन्नाभाईनी ओळखली आहे. रुग्णांना शहराच्या ठिकाणी जाणे परवडत नाही. त्यामुळे गावात असलेल्या डॉक्टरकडून कमी खर्चात उपचार करून घेण्याकडे रुग्णांचा कल असतो. वैद्यकीय ज्ञान नसल्याने योग्य निदान न करता बोगस डॉक्टर केवळ अंदाज लावून हायडोस औषधांचा मारा रुग्णांवर करतात. त्यामुळे अनेकदा रुग्णांची प्रकृती गंभीर होऊन मृत्यूच्या घटनाही घडल्याचे अनेक प्रकार जिल्ह्यात घडत आहेत त्याचबरोबर जिल्ह्यात परराज्यांतून आलेल्या बोगस डॉक्टरांनी आपला जम बसविला आहे. स्थानिक लोकप्रतिनिधीसोबत जुळवून घेत त्यांची मर्जी राखली जात आहे. बोगस डॉक्टर सरसकट ऍलोओपॅथी प्रॅक्टिस करीत असल्याचे चित्र आहे. उपचारही तेच करतात आणि स्वतः जवळील औषध देऊन रुग्णांकडून पैसेही उकळले जातात. अशा बोगस डॉक्टरांनी रुग्णांवर केलेला उपचार हा चुकीचा असून त्यासाठी हाय पावरचा डोस दिला जातो रुग्णांच्या आरोग्यावर त्याचे विपरीत परिणाम होऊन रुग्णांच्या जीवित वाला धोका तयार होतो.या चुकीच्या उपचारामुळे रुग्णांना किडन्या गमविण्याची वेळ आली आहे. मुन्नाभाई बोगस डॉक्टर वर गुन्हा नोंद झाल्यावरही ते आपली दुकानदारी बंद करीत नाही. राजकीय आश्रय घेत त्याच गावात दुकान थाटतात. तर काही जण गाव बदलून दुकानदारी सुरूच ठेवतात.

जिल्ह्यातीलास्तरिय समिती

बोगस डॉक्टरांविरुद्ध कारवाई करण्यासाठी जिल्हास्तरीय बोगस डॉक्टर शोध समिती या समितीकडून बोगस डॉक्टरांचा शोध घेतला जावा.परंतु जिल्हास्तरीय समितीनेच डोळे मिटून घेतले असल्याने मोठा बिकट प्रश्न जालना जिल्ह्यात दिसत असून यामुळे सर्वसामान्य जनतेच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.जिल्हास्तरीय समितीने याकडे लक्ष घालून आक्रमक पवित्रा घेणे आवश्यक झाले आहे.

गर्भपात अन् शस्त्रक्रिया

“यत्र नार्यस्तु पुजयन्ते रमन्ते तंत्रज्ञ देवता” याचा अर्थ होतो की जेथे नारीचा अर्थात स्त्रीचा आदर सन्मान केला जातो तेथेच परमेश्वराचा वास असतो परंतु जिल्ह्यात हे सर्व विपरीत होतांना दिसत आहे .या अगोदरही अशा अवैध गर्भपाताच्या ज्या घटना घडल्या यामध्ये गर्भपात करण्यातच बोगस डॉक्टर चांगलेच माहीर झाले असून, बक्कळ पैसाही कमावत आहेत. इतकेच नव्हे तर मूळव्याध, भगंदरच्या रुग्णांवर शस्त्रक्रिया करून अनेकांच्या जिवाशी अक्षरशः खेळ खेळला जात आहे. अनेक जण मूळव्याध व भगंदर तज्ज्ञ म्हणूनही वावरताना दिसतात या अशा बोगस डॉक्टर मुन्नाभाईवर केव्हा कारवाई होणार याची उत्सुकता नागरिकांना लागली आहे.

Previous articleभारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा आपमान करण्याऱ्या जितेंद्र आव्हाड चा जाहीर निषेध..
Next articleवारकरी मंच नागपूर शहराच्या वतीने वारकरी अध्यात्मिक बाल सुसंस्कार शिबीरास प्रारंभ —
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here