Home नाशिक वारकरी मंच नागपूर शहराच्या वतीने वारकरी अध्यात्मिक बाल सुसंस्कार शिबीरास प्रारंभ —

वारकरी मंच नागपूर शहराच्या वतीने वारकरी अध्यात्मिक बाल सुसंस्कार शिबीरास प्रारंभ —

149

आशाताई बच्छाव

1000414913.jpg

वारकरी मंच नागपूर शहराच्या वतीने वारकरी अध्यात्मिक बाल सुसंस्कार शिबीरास प्रारंभ —

दैनिक युवा मराठा
रामभाऊ आवारे
निफाड नाशिक प्रतिनिधी

संत परंपरा वारकरी संप्रदाय आणि पंढरपूर वारी हा महाराष्ट्राचा अध्यात्मिक व सांस्कृतिक वारसा आहे. भावी पिढीला हा वारसा शास्त्र शुद्ध पद्धतीने मिळावा यासाठी या वर्षी उन्हाळी शिबिर मधे वारकरी मंच महाराष्ट्र राज्य नागपुर शहर कडून लहान मुलांसाठी उन्हाळी शिबीर म्हणजेच ” वारकरी आध्यात्मिक बाल सुसंस्कार शिबीर २०२४ उद्घाटन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.
तसेच या शिबिराच्या उद्घाटन सोहळ्याला प्रमूख पाहुणे अयोध्या भाग संघचालक मनोहररावजी सपकाळ आणि रोजगार व स्वयंरोजगार विभाग नागपूर जिल्हाध्यक्ष विनोदजी मिसाळ आपल्याला प्रमूख पाहूणे म्हणुन लाभलेले होते. या वेळीं मुलांना खरी जीवनाची सुरूवात योग्य वेळी कशी व कोठून करावी अशे मोलाचे मार्गदर्शन मनोहररावजी सपकाळ यांनी केलेत. त्याचप्रमाणे या युगात पाल्यांसाठी पालकांचे काय कर्तव्य आहे हि भूमिका घेऊन विनोदजी मिसाळ यांनी उद्बोधन केलेत व प्रमुख पाहुण्यांनी सर्व विद्यार्थ्यांना पुढील भविष्यासाठी खूप खूप शुभेच्छा दिल्यात.
या २२ दिवसीय आध्यात्मिक शिबिर मध्ये वारकरी हरिपाठ, श्लोक, प्राणायाम, योगासने, बौद्धिक खेळ, पुरातन वाद्यांचा अभ्यास, हस्तकला, प्राचीन शिवकला, गीत, भजने, पसायदान, सूर्यनमस्कार, राम रक्षा स्तोत्र, हनुमान चालीसा पठण इ. चे प्रशिक्षण देण्यात येणार आहे.
कार्यक्रमाचे आयोजन वारकरी मंच महाराष्ट्र राज्य नागपुर शहर पदाधिकारी आणि टीम विठ्ठल पदाधिकारी यांनी केलेले आहे. या वेळी शहर अध्यक्ष दिनेश कांबळे, टीम विठ्ठल पदाधिकारी दुशांत जूनघरे, रोहीत बूधे, सोहम पालोदे, नकुल पिंपळापुरे, भावेश बुरिले, तन्वी निलेश भेंडे तसेच टीम रामा पदाधिकारी उपस्थित होते. तसेच हा कार्यक्रम वारकरी मंच महाराष्ट्र राज्य नागपुर जिल्हा अध्यक्ष मयुर वाजगे यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आला.सदर कार्यक्रमाची माहिती प्रदेश प्रसिद्धी प्रमुख रामभाऊ आवारे (निफाड) यांनी प्रसिद्ध करुन संस्थापक अध्यक्ष ह भ प निलेश महाराज कोंडे/ देशमुख आळंदीकर ,उपाध्यक्ष बाबासाहेब मुरलीधर सोनटक्के, संघटक शरद कैलास आढाव तसेच वारकरी मंच सर्व पदाधिकाऱ्यांनी केलेल्या मार्गदर्शनाबद्दल सर्वांचे आभार मानले.

Previous articleना वैद्यकीय पदवी,ना वैद्यकीय ज्ञान तरीही मुन्नाभाईं डाॅक्टरांचा व्यवसाय जोमात.
Next articleनांदुर्डी विद्यालयात प्रज्ञा निफाडे प्रथम– विद्यालयाचा शेकडा निकाल ९३.८४%
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.