Home नाशिक वनसगाव येथील वाघ कुटुंबातील बहिण -भाऊ पोलीस उपनिरीक्षक

वनसगाव येथील वाघ कुटुंबातील बहिण -भाऊ पोलीस उपनिरीक्षक

70
0

आशाताई बच्छाव

1000293507.jpg

वनसगाव येथील वाघ कुटुंबातील बहिण -भाऊ पोलीस उपनिरीक्षक

मोठे बंधू निलेशकुमार वाघ यांच्या पाठोपाठ बहीण अर्चना ही पोलीस उपनिरीक्षक पदी

दैनिक युवा मराठा
निफाड नाशिक प्रतिनिधी रामभाऊ आवारे

वनसगाव तालुका निफाड येथील माहेर असलेल्या सेवानिवृत्त शिक्षक संभाजी देवराम वाघ व आई सौ जनाबाई संभाजी वाघ यांची कन्या सौ अर्चना बापू धाकतोडे हिने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या मार्फत देण्यात आलेल्या एमपीएससी परीक्षेत पहिल्या प्रयत्नात पोलीस उपनिरीक्षक पदाला गवसणी घातल्याने वाघ व धाकतोडे परिवारासह सर्व मित्र परिवारात तिच्या या यशाबद्दल अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
केल्याने होत आहे रे आधी केलीच पाहिजे त्याचप्रमाणे जीवन जगत असताना ध्येय गाठण्यासाठी प्रयत्न केला की, निश्चित यश प्राप्त होते याचे मूर्तीमंत उदाहरण म्हणजे वनसगाव येथील सेवानिवृत्त शिक्षक संभाजी देवराम वाघ व मातोश्री सौ जनाबाई संभाजी वाघ यांची कन्या सौ अर्चना बापू धाकतोडे / वाघ.जिद्द, सातत्य, चिकाटी ,साहस ,समर्पण व त्यागाची भावना ठेवून ध्येयापर्यंत पोहचण्यासाठी केलेली मेहनत म्हणजेच यश असे म्हणणे वावगे ठरणार नाही.अर्चना वाघ यांचा विवाह सिन्नर तालुक्यातील दहिवडी येथील बापु धाकतोडे यांच्याशी झाला होता. विवाह नंतर कौटुंबिक जबाबदारी सांभाळत एमपीएससी परीक्षा देण्याचा मनात विचार आल्यानंतर सासू-सासरे व पती यांनी संमती दर्शविल्यानंतर खऱ्या अर्थाने एमपीएससी च्या अभ्यासाला प्रारंभ केला. वडील भाऊ निलेश वाघ यांनी अथक परिश्रमानंतर पोलीस उपनिरीक्षक पदाला गवसणी घातल्यानंतर व लहान भाऊ सागर (शिक्षक) यांचे विशेष मार्गदर्शन लाभले. त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या एमपीएससी परीक्षेच्या अभ्यासास प्रारंभ केला. सिन्नर तालुक्यातील दहीवाडी येथील सौ अर्चना बापू धाकतोडे यांनी कुटुंब व मुलाचे संगोपन पहिल्याच प्रयत्नात महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या पोलिस उप- निरीक्षक पदाच्या परीक्षेत यश मिळविले. दहिवडी तालुका सिन्नर येथे नागरिकांनी भव्य सत्कार समारंभ आयोजित करताना गावातून मिरवणुकी द्वारे तिच्या यशाचे कौतुक केले आहे.
प्राथमिक शिक्षकाची डी. एड.ची पदवी उत्तीर्ण झाल्यानंतर नोकरीसाठी अनेक ठिकाणी प्रयत्न केले. चूल आणि मूल यात न गुंतता आपणही स्पर्धा परीक्षेद्वारे मोठ्या पदाला गवसणी घालू शकतो हा विचार मनात ठेवला असे त्यांनी सांगितले. विवाहानंतर ही पती, सासू, सासरे यांची स्पर्धा परीक्षेसाठी साथ लाभली.स्वतःचा भाऊ पोलिस उपनिरीक्षक झाला. मी का होऊ नये? म्हणून नेहमी खाकी वर्दी आपल्या अंगावर असावी या विचाराने स्पर्धा परीक्षेला सामोरे जात यश संपादन केले.पती बापू शामराव धाकतोडे प्राथमिक शिक्षक पदावर सुरगाणा, सिन्नर तालुक्यात कार्यरत असताना कौटुंबिक जबाबदारी सांभाळत यश मिळविल्याचे अर्चना यांनी सांगितले. माझ्या या यशात माझी आई ,वडील ,दोन्ही भाऊ, भावजय व आप्तेष्ट त्याचप्रमाणे माझे पाठीराखे पती व सासू-सासरे यांचे पाठबळ मिळाल्यानेच मी हे अशक्यप्राय यश संपादन करू शकले हे यश खऱ्या अर्थाने या सर्वांचेच आहे असे मी मानते.

सौ अर्चना बापू धाकतोडे /वाघ (दहीवडी)
नवनियुक्त पोलीस उपनिरीक्षक

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here