Home बीड अंबाजोगाई तालुक्यातील अंबासाखर परिसरात तरुणाचा झाला खून

अंबाजोगाई तालुक्यातील अंबासाखर परिसरात तरुणाचा झाला खून

40
0

आशाताई बच्छाव

1000288163.jpg

अंबाजोगाई तालुक्यातील अंबासाखर परिसरात तरुणाचा झाला खून

मोहन चव्हाण
ब्युरो चीफ बीड जिल्हा

बीड/अंबाजोगाई दि:१५ अंबाजोगाई शहरापासून जवळच ०७ कि मी अंतरावर असलेल्या अंबासाखर कारखाना परिसरात काल रविवारी दिनांक १४ एप्रिल २०२४ रोजी एका तरुणाचा तीक्ष्ण हत्याराने भोसकून खून करण्यात आला असून, या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. सविस्तर माहिती अशी की, संजय आत्माराम राठोड (वय ३५ वर्ष रा. राडी तांडा ता. अंबाजोगाई ) असे मयत झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. रविवारी सायंकाळी ७:३० वाजताच्या सुमारास तो अंबासाखर परिसरात असताना एका अज्ञात व्यक्तीने त्याच्या छातीत तीक्ष्ण हत्याराने भोसकून त्याचा निघृनपणे खून केल्याची माहिती मिळाली आहे. या घटनेची माहिती मिळताच अंबाजोगाई ग्रामीण पोलीस तत्काळ घटनास्थळी धाव घेतली असून सदरील घटनेचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण रुग्णालय अंबाजोगाई येथे पाठवण्यात आला आहे. किरकोळ वादातून हा प्रकार घडल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली असून कुणाचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसून पुढील तपास अंबाजोगाई ग्रामीण पोलीस करीत आहेत.

Previous articleअनसिंग येथे राजस्थानी महिलांची गणगौर उत्साहात संपन्न
Next articleयुवा मराठाचे दावल पगारे यांना पितृशोक
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here