Home जालना विदेशी दारू वाहतूक करणारा इसम, 4,18,160 रुपयांच्या मुद्देमालासह जेरबंद .

विदेशी दारू वाहतूक करणारा इसम, 4,18,160 रुपयांच्या मुद्देमालासह जेरबंद .

61
0

आशाताई बच्छाव

IMG_20240322_093805.jpg

विदेशी दारू वाहतूक करणारा इसम, 4,18,160 रुपयांच्या मुद्देमालासह जेरबंद .
जिल्हा प्रतिनिधी जालना-वसंतराव देशमुख

याविषयी सविस्तर माहिती अशी की, जालना शहरातील अवैध धंदे करणाऱ्या इसमावर कारवाई करण्याबाबत मा. पोलीस अधीक्षक श्री अजय कुमार बन्सल यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री रामेश्वर खनाळ यांना सूचना दिल्या होत्या. त्या अनुषंगाने पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा जालना यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे अमलदार यांना अवैध धंदे करणाऱ्या इसमावर कारवाई करण्याच्या सूचना देऊन मार्गदर्शन केले होते.
त्या अनुषंगाने दिनांक 21/0 3 /2024 रोजी माननीय पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा जालना यांनी अवैध धंदे करणाऱ्या ईसमाविरुद्ध स्थानिक गुन्हे शाखेचे एक पथक नेमले. पथकातील अंमलदार हे जालना शहरात अवैध धंद्याची माहिती घेत असताना त्यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, जालना शहरातून मस्तगडकडून मीयाॅसाब दर्गा चौकाकडे एक बोलेरो ही अवैध विदेशी दारू घेऊन चोरटी विक्री करण्यासाठी घेऊन जात आहे. अशी खात्रीलायक माहिती मिळाल्याने स्थानिक गुन्हे शाखेतील पथक यांना ठीक 13: 30 वाजता मीयाॅसाब दर्गा चौकात एक पांढऱ्या रंगाची बोलेरो गाडी जात असताना दिसली. त्यांनी सदर बोलेरो चालकास गाडी थांबविण्याचा इशारा करून गाडी थांबून सदर बोलेरो गाडीतून 68,160 रुपयांची विदेशी कंपनीची दारू व एक 3,50,000 हजार रुपये किमतीची एक पांढऱ्या रंगाची बोलेरो गाडी जिचा पासिंग क्रमांक M.H. 44 B-17 98 असा एकूण 4,18,160-00 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
सदरची कारवाई माननीय पोलीस अधीक्षक श्री अजय कुमार बन्सल व मा.अप्पर पोलीस अधीक्षक श्री आयुष नोपाणी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री रामेश्वर खानाळ स्थागुशाचे अमलदार विनायक कोकणे, गोपाल गोशिक, लक्ष्मीकांत आडेप, देविदास भोजने ,भागवत खरात, विलास चेके सर्व स्थानिक गुन्हा शाखा जालना यांनी केली आहे.

Previous articleकेंद्रीय मंत्री ना. रावसाहेब पाटील दानवे यांच्या मार्गदर्शनाखाली भाजपा बूथ पदाधिकारी मेळावा संपन्न
Next articleकेज पोलिसांच्या दडपशाही विरोधात पत्रकारबांधवानी तहसीलदारांना दिले निवेदन
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here